दाजीपूर अभयारण्य, राधानगरी, कोल्हापूर • Dajipur Wildlife Sanctuary Car Drive from Forest, Radhanagri
Автор: DK Wadkar Vlogs
Загружено: 2023-04-26
Просмотров: 1442
#दाजीपूर #अभयारण्य #राधानगरी #कोल्हापूर #Dajipur #Wildlife #Sanctuary #car #drive #forest #radhanagri #kolhapur
प्रत्येक ऋतू आपल्या परीने सृष्टीला नवे रूप देत असतो. हिरवागर्द परिसर, रंगीबेरंगी रानफुलांच्या दुनियेने दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना खुणावते आहे. जंगलात भटकंती करण्यासाठी दाजीपूर अभयारण्य सज्ज झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मी. आहे. समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ९०० ते १००० फूट असून, येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मि. मी. असते. राधानगरी अभयारण्यातील एक भाग म्हणजे दाजीपूर. येथे पर्यटकांना सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वन्यजीव विभागाचे तिकीट घेऊन प्रवेश दिला जातो. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दाजीपूर हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य. गवे आणि सात वर्षांतून एकदा फुलणारी कारवी वनस्पती हे इथले प्रमुख आकर्षण असले तरी हे निमसदाहरित जंगलवेली, झुडपे, झाडे आपल्या विविध रूपांचे दर्शन घडवितात.
कोल्हापूरपासून ८० कि.मी.वर असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यात आढळणारे पक्षीविश्व, प्राणीसंपदा, औषधी वनस्पती, तसेच फुलपाखरे इथल्या संपन्न जैवविविधतेचे दर्शन घडवते. पर्यटकांना दाजीपूर अभयारण्याबरोबरच आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे अभयारण्याची ओळख करून देणारे माहिती केंद्र, टेहाळणी मनोरे त्याच बरोबर शिवगड, हत्तीमहाल येथील साठमारी, राधानगरी धरणाच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेला बेंझील व्हिला, उगवाई देवराई, हसणे देवराई आणि राधानगरी येथे नव्याने सुरू केलेले फुलपाखरू उद्यान हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
कोल्हापूरहून दाजीपूरला जातेवेळी खिंडी व्हरवडे घाटापासून निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराची झलक पाहायला मिळते. अभयारण्याच्या मध्यापर्यंत खुरटे जंगल, त्यानंतर उंच झाडे आणि शेवटी सडा. अशा तीन टप्यांत विखुरलेल्या या जंगलात औषधी वनस्पती, कीटकांपासून ते बिबट्यापर्यंतच्या जीवांच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हजारोंच्या संख्येने आढळणारी ब्लू टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राइप टायगर ही फुलपाखरे पाहायला मिळतात. अभयारण्यात भरउन्हात जाणवणारा नैसर्गिक गारवा, हिवाळ्यातील गुलाबी थंडी, सह्याद्रीच्या कुशीतील वृक्षवल्ली आणि समृद्ध जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी दाजीपूरला एकदा भेट द्यायलाच हवी. सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्यटनासाठी राधानगरीतील राधानगरी नेचर क्लब व बायसन क्लबतर्फे अभयारण्य परिसरातील पर्यटनस्थळी अनेक सोयी उपलब्ध करून देत आहे. भोजन, वाहन व निवासाच्या सोयीसाठी राधानगरी नेचर क्लबकडून नेहमीच सहकार्य मिळते.
मंडळ, मी तुम्हांला मस्त भटकंतीच्या ठिकाणांची मातृभाषेतून इत्यंभूत माहिती देत असतो. मला फिरायला, शूट करायला आणि त्याचा व्हिडीओ बनवायला आवडतं. तेंव्हा हा चॅनेल subscribe करायला विसरू नका. तेव्हा पाहत राहा आनंद घेत रहा. आमचे काम तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करून कंमेंट करा आणि विडिओ शेअर करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: