सुरदास भजनी मंडळ उदगीर
Автор: संत प्रसाद योग
Загружено: 2024-03-23
Просмотров: 578
सुरदास भजनी मंडळ उदगीर #अभंग #गौळण#भजन
श्री संत सुरदास भजनी मंडळ उदगीर भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धा
श्री संत सुरदास भजनी मंडळ उदगीर भजन सादरीकरण
अभंग
आधी रचिली पंढरी ।मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हा नव्हते चराचर ।तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा ।तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी ।धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ ।उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी ।म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी ।आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥
अभंग
घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे | १ |
डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख |२ |
तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण | ३ |
मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी | ४ |
तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा | ५ |
गौळण
आल्या पांच गौळणी | पांच रंगाचे शृंगार करूनि ||धृ||
पहिली गौळण रंग सफेत | जशी चंद्राची ज्योत | गगनीं चांदणी लखलखीत |
ऐका तिची मात | मंथन करीत होती दारांत | धरुनी कृष्णाचा हात |
ऐशा आल्या पांच गौळणी ||२||
दुसरी गौळण भाळीभोळी | रंग हळदीहुनि पिवळी | पिवळा पीतांबर नेसुनी आली |
अंगी बुट्टेदार चोळी | एक लहान तनु उमर कवळी | जशी चाफ्याची कळी |
ऐशा आल्या पांच गौळणी ||३||
तिसरी गौळण रंग काळा | नेसुनी चंद्रकळा | काळें काजळ लेऊनि डोळा |
रंग तिचा सांवळा | काळी गरसोळी लेऊनि गळां | आली राजस बाळा |
ऐशा आल्या पांच गौळणी ||४||
चौथी गौळण रंग लाल | लाल लाल ही लाल | कपाळीं कुंकुम चिरी लाल |
भांगी भरून गुलाल | मुखीं विडा रंग लाल | जसें डाळिंबीचें फुल |
ऐशा आल्या पांच गौळणी ||५||
पांचवी गौळण हिरवा रंग | जसें आरशात जडलें भिंग | फुगडी खेळतां कृष्णासंग |
एकनाथ अभंग | ऐशा आल्या पांच गौळणी ||६||
https://youtube.com/@shraddhashrutika...
• अरे कान्हा कृष्ण मुरारी #मराठी #गवळण #भजन ...
• तू माऊलीहुनी मायाळ ।संत तुकाराम महाराजांचा...
• जाऊ दे घट भरण्या यमुनेला #गौळन #मराठी#l#tr...
• मुरली मनोहर रे माधवा #गौळणी । Murali Manoh...
#अभंग#भजन#गौळण #smmusicicon
भजन स्पर्धा शेल्हाळ अतिशय उत्कृष्ट सादरीकरण# अभंग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: