Jogwa
Автор: Naadsaptak Sangeet Vidyalaya
Загружено: 2021-10-09
Просмотров: 1414146
#jogwa2k21 #naadsaptaksangeetvidyalaya #musicvideo #music #jogwa #youtube #navratrispecial #like #share #subscribe #love #indianmusic #maharashtra #musician #youtubechannel #sub #500subs #1000subscribers
।। जोगवा ।।
गीतकार व संगीतकार- ©️ गिरीश पंचवाडकर
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
भवानी कौल दे उजवा
भवानी कौल दे उजवा
अंबिके मागतो जोगवा....।।धृ।।
सिंह तुझे अंगात भिनू देsssअहाss
पाताळी दैत्यास चिणू देsssअहाss
सिंह तुझे अंगात भिनू दे
पाताळी दैत्यास चिणू दे
देह देह देव्हारा व्हावा ssss
देह देह देव्हारा व्हावा
दिव्या दिव्यांचा पेटव वणवा
दिव्या दिव्यांचा पेटव वणवा
दिव्या दिव्यांचा ssss पेटव वणवा
वणवा, वणवा, वणवा
अंबिके मागतो जोगवा....
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे ।।१।।
कवड्यांची तव माळ घालू देsssअहाss
सत्वगुणांची परडी भरू देsssअहाss
कवड्यांची तव माळ घालू दे
सत्वगुणांची परडी भरू दे
पोत तुझा हा हाती धरावा ssss
पोत तुझा हा हाती धरावा
नवरात्रीचा जागर व्हावा
नवरात्रीचा जागर व्हावा
नवरात्रीचा ssss जागर व्हावा
व्हावा, व्हावा, व्हावा
अंबिके मागतो जोगवा....
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे ।।२।।
सन्मार्गी सत्कर्म घडू देsssअहाss
ज्ञानाचे चौघडे झडू देsssअहाss
सन्मार्गी सत्कर्म घडू दे
ज्ञानाचे चौघडे झडू दे
भक्तिभाव हा मनी धरावा ssss
भक्तिभाव हा मनी धरावा
शरण तुला मी आशिष द्यावा
शरण तुला मी आशिष द्यावा
शरण तुला मी ssssआशिष द्यावा
द्यावा, द्यावा,द्यावा
अंबिके मागतो जोगवा....
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे
उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे ।।३।।
उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
उदे ग अंबे उदे,माऊली मागतो जोगवा
भवानी कौल दे उजवा
भवानी कौल दे उजवा
अंबिके मागतो जोगवा....
आई राजा उदे उदे उदे
सदानंदीचा उदे उदे उदे
तुळजापूरच्या भवानी आईचा उदो उदो, उदो उदो
माहुरगड वासिनी रेणुका उदो उदो,उदो उदो
करवीर वासिनी अंबाबाईचा उदो उदो,उदो उदो
नाशिक वणीच्या सप्तश्रृंगीचा उदो उदो,उदो उदो
अंबेजोगाई योगेश्वरीचा उदो उदो,उदो उदो
आदिमाया दुर्गादेवीचा उदो उदो,उदो उदो
महालक्ष्मी.......उदो उदो
सरस्वतीचा.......उदो उदो
विंध्यवासिनी.......उदो उदो
चतु:शृंगीचा.......उदो उदो
परमेश्वरीचा.......उदो उदो
भुवनेश्वरीचा.......उदो उदो
वज्रेश्वरीचा.......उदो उदो
अंबाबाईचा.......उदो उदो
---------------------------------
नादसप्तक संगीत विद्यालय" प्रस्तुत,
।। जोगवा ।।
*गीतकार व संगीतकार- गिरीश पंचवाडकर
*दिग्दर्शक- अक्षय पंचवाडकर
*संगीत संयोजन- नागेश भोसेकर
मिहीर भडकमकर
अक्षय पंचवाडकर
*ऑडिओ रेकॉर्डिंग- पंचम स्टुडिओ,पुणे
*साउंड इंजिनिअर- श्रेयस दांडेकर
*व्हीडिओज- चिन्मय बेरी, अनुज यादव
*गायिका-
नलिनी वाकणकर,मनीषा जोशी,प्रतिमा नेवाळकर,स्वप्ना मराठे,गौरी पंचवाडकर,स्वाती ताले, रूपा इनामदार,मेधा सेनगावकर,तनिका ढवळे,अर्चना देशमुख,पल्लवी लिमये,दिपाली करंदीकर, वरदा जोशी,रश्मी पन्हाळकर, वृषाली अष्टीकर, डॉ.आदिती पंचवाडकर-ताले, मयुरी देशपांडे- पंचवाडकर, जान्हवी मोडक, श्रावणी कुलकर्णी, पूनम थोरवे.
*गायक- धवल ताले, नीरज फडके आणि अक्षय पंचवाडकर.
*वाद्यवृंद-
अक्षय पंचवाडकर- तबला
नागेश भोसेकर- संबळ,ढोलकी,बगलबच्चा,
पखवाज,दिमडी,शंख,डफ,झान्ज, टाळ, घुंगरू.
मिहीर भडकमकर- सिंथेसायजर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: