Chhatrapati Shivaji Maharaj Temple Bhiwandi | छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी | Vlog no - 06
Автор: Kunal Explorer
Загружено: 2023-03-10
Просмотров: 1874
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)
यांचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वाडा रस्त्यावरील निसर्गरम्य अशा मराडे पाडा या ठिकाणी दीड एकर जागेत साकारण्यात येत आहेत. शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा (Chhatrapati Shivaji Maharaj Temple) संकल्प केला गेला. त्यानंतर 2018 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन होऊन या कामाचा शुभारंभ झाला. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात अनेक अडचणींचा सामना करत या मंदिराचे आतापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.
कसे असणार हे मंदिर?
या मंदिराची रचना किल्ल्याच्या तटबंदी सारखी असून त्यामध्ये भव्य मंदिर उभारणे सुरू असून तटबंदीच्या आतील बाजूस 40 कप्पे आहेत. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र ऐतिहासिक शिल्पाच्या माध्यमातून साकारली जाणार आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: