सुखाचा शोध घेताना... इंद्रजित देशमुख यांचे जबरदस्त व्याख्यान | Indrajeet Deshmukh speech 2025
Автор: M D Live Marathi
Загружено: 2025-06-11
Просмотров: 65873
#Indrajeet_Deshmukh_speech _2025 #dharashiv #इंद्रजित_देशमुख
कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक सत्कार सोहळ्यात इंद्रजित देशमुख यांचे 'सुखाचा शोध घेताना' या विषयावर प्रभावी व्याख्यान
कळंब: कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा बुधवार, दिनांक ११ जून रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे 'सुखाचा शोध घेताना' या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान होते, ज्याने उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अशोक जगताप, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, सहाय्यक निबंधक सातवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, फेटा, बुके आणि उपयुक्त इंग्रजी शब्दकोश देऊन गौरवण्यात आले. तसेच, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी रक्कमेचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाचा यथोचित सन्मान करण्यात आला, ज्यामुळे वातावरण भावुक झाले होते.
इंद्रजित देशमुख यांनी आपल्या व्याख्यानात जीवनातील सुख आणि समाधानाचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आणि ज्ञानार्जनाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होण्याचे मार्गदर्शन केले. त्यांचे विचार ऐकून सभागृहातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले आणि संस्थेेद्वारे आयोजित या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
या सत्कार सोहळ्याला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले, ज्यामुळे हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: