दुर्ग
Автор: Nagar Trekkers
Загружено: 2025-07-03
Просмотров: 448
सिंदोळा दुर्ग | #माळशेज घाट | हरिश्चंद्रगडाला मिळालेल्या वारे माप प्रसिद्धीमुळे या गडाचे अस्तित्व झाकोळले गेलेले होते. गिरी मित्रांचे पावले देखील इथे सहजपणे वळत नव्हते
उत्तर कोकणातील बंदरांना #जुन्नर (जिर्णनगर) या घाटमाथ्यावरील बाजारपेठेला जोडणार्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले वेगवेगळ्या काळात बांधले गेले. जुन्नरचे रक्षण करणारा शिवनेरी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हडसर, चावंड, जिवधन, #नारायणगड, हनुमंत-निमगिरी आणि #सिंदोळा या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. जूना माळशेज घाट चढून गेल्यावर त्याच्या माथ्यावर असणार्या सिंदोळा किल्ल्याची निर्मिती ही प्रामुख्याने घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी केली होती
.
दक्षिणोत्तर पसरलेला या गडाचा माथा फारसा मोठा नाही. मात्र या गडावरून निमगिरी हनुमंत गड चावंड हडसर शिवनेरी नाणेघाटाच काहीसा परिसर भोजपुरी हरिश्चंद्रगड माळशेज घाटाचा रस्ता हटकेश्वर डोंगररांग गणेश खिंड, मढपारगाव, पिंपळगाव जोगा धरण आणि कुकडी खोरे सर्व काही नजरेच्या टप्प्यात येते.
#fortsofmaharashtra #nagartrekkers #junnar #naneghat
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: