घरफोडी करून सोन्या चांदीचे दागीने रोख रक्कम चोरी करणा-या चोरटयास शिरूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
Автор: MJ News 90
Загружено: 2025-12-04
Просмотров: 94
घरफोडी करून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम ऐवज चोरी करणा-या चोरटयास शिरूर पोलीसांनी केले जेरबंद" शिरूर DB पथक व आय कार
युनिट यांची संयुक्त कारवाई
संपादक/वार्ताहर यांना सदर प्रेसनोटदावारे माहीती देण्यात येते की, दिनांक २०/११/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते रात्रौ २०/०० वा चे सुमारास मौजे रामलींग हत्ती रोड जाधव मळा शिरूर ग्रामीण ता शिरूर जि पुणे येथे फिर्यादीचे राहते घराचा दरवाजाचे कुलुप कोणतरी अज्ञात चोरटयाने तोडुन घरामध्ये प्रवेश करून घराचे बेडरूम मधील लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे चांदीचे व रोख रक्कम असा एकुण २,६०,०००/-रू किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इरादयाने घरफोडी चोरी करून चोरून नेला असल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८२९/२०२५ भा.न्या. संहिता कायदा कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे सोो, यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांना सदर गुन्हयातील चोरटयाचा व गेले मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे सोो यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्हयातील चोरट्याचा व गेले मालाचा सी टी व्ही फुटेज तसेच संदिप चिर्के, आयकार युनिट पुणे ग्रामीण यांचेकडुन तांत्रीक विश्लेषनाचा आधार घेत शोध घेत असताना सदरचा गुन्हा आरोपी नामे प्रकाश विलास गायकवाड. रा रामलिंग रोड शिरूर ता शिरूर जि पुणे यानी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी नामे नामे प्रकाश विलास गायकवाड. रा रामलिंग रोड शिरूर ता शिरूर जि पुणे हा रामलींग ता शिरूर जि पुणे परीसरात असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी सापळा लावुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली होती. सदर आरोपीताकडुन पोलीस कोठडीमध्ये केलेल्या तपासामध्ये गुन्हयातील चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी १,१४,९००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री संदिप गिल साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले साो मा.पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे साो, यांचे मार्गदर्शनाखाली संदिप चिर्के कनिष्ठ तज्ञ सहा. पोलीस आयकार युनिट पुणे ग्रामीण, शिरूर पोलीस ठाणे DB पथकाचे पोसई श्री. शुभम चव्हाण, पोलीस अमंलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे. #mjnews90 #news #come #people #police #crime #ahmednagar #अहमदनगर #शिरूर #छत्रपतीशिवाजीमहाराज #महाराष्ट्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: