“मुगले मुगले नास लो”// Mugle Mugle Nas loo.
Автор: Bassein Productions
Загружено: 2026-01-10
Просмотров: 1951
शेतीवाडीतल्या कष्टांच्या कामातून जरा उसंत मिळाली की आमच्या कुपारी बायका एकत्र जमायच्या... स्वतः साठी चोळी शिवणे, चोळीवर नक्षीकाम करणे, असं करता करता सहज सुचणारी किंवा जुन्या गाण्यात स्वतःची नवी ओळ जोडत त्या गाणी म्हणायच्या .त्यावेळी आजूबाजूला हुंदडणारी आमची लहानगी बाळगोपाळंसुद्धा ही गाणी ऐकत..ही गमतीशीर गाणी झोपाळ्यावर बसून , अंगणात खेळता खेळता निरागसपणे गुणगुणत . ही बडबडगीतं मोठ्यांनी खास लहानग्यांच्या आनंदासाठी प्रेमानं घडवलेली होती. आणि पिढ्यांनी ती आजवर जपली...
झोपाळ्यावर बसून, आपल्या छोट्या भावंडांना सोबत घेऊन ही मुलं गात, खेळत आणि मनमुराद रमून जात. या बडबडगीतांतून त्यांच्या दैनंदिन जीवनाचं सुंदर प्रतिबिंब उमटतं. प्राणी-पक्षी, फळं-फुलं, माणसं, त्यांचं वागणं आणि व्यवसाय—या सगळ्याचं सहज, सोप्या शब्दांत वर्णन या गीतांत आढळतं.
ही बडबडगीतं केवळ करमणुकीचं साधन नव्हती; ती बालमनाची निरागसता जपणारी आणि आपल्या संस्कृतीचा ठेवा जतन करणारी एक मौल्यवान लोकपरंपरा होती.
आज खास बाळगोपाळांसाठी घेऊन येत आहोत एक अस्सल कुपारी बडबडगीत — “मुगले मुगले नसलो”.
निवेदन- मॅक्लिना रिबेलो
गीत सादरीकरण -डॉ.रिबेका दोडती
मुगले मुगले नास लो नास लो
तू ये पिले पास लो पास लो
पासासा एक पिलो मरोया मरोया
गाड्या घोड्या भरोया भरोया
गाड पडला ओदोडी आदोडी
पील पडला मादोडी मादोडी
पिलाशी जाली बाय वाटोळी वाटोळी
ओबाय नेसली पाटोळी पाटोळी
ओबायसा पाटॉळा गाजयला गाजयला
गाजयला तॅ धुवी जाय धूवी जाय
धुविता धुविता फाटला फाटला
फाटला तॅ हिवी जाय हिवी जाय
हिवीता हिवीता हुयो मॉडालयॊ हुयॉ मॉडाल्यो...
शिंपीनी रांड्यो पळाल्यॊ पळाल्यो...
बना ऑळ्या लिकालॉ लिकालॉ..
बनाला आलॅ बाय आंबॅ आंबॅ
मंबय नेता विकलॅ विकलॅ...
ठाण्या नेता पिकलॅ पिकलॅ ...
ठाण्याशी बायकू करशील का ..करशील का...
शंभर सापा भरशील का भरशील.का
शंभर साप्याला वाणा नाय वाणा नाय...
पाटला बायकूला खाणा नाय खाणा नाय...
शोंब्यो शोंब्यो शोंब्यो शोंब्यो.......
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: