Politicalnews:पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत रंगणार शिवसेना शिंदे गटविरुद्ध भाजप सामना
Автор: Voice of Chalisgaon
Загружено: 2025-11-17
Просмотров: 15753
पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत रंगणार शिवसेना शिंदे गटविरुद्ध भाजप सामना
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील यांनी दाखल केला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाचोरा शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनीता पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
सुनिता पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ रिंगणात
भाजपाकडूनही शनिवारी पाचोरा मध्ये शक्ती प्रदर्शन करत दाखल केला सुचेता वाघ यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्यात सर्वात प्रथम स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने महायुती फूट पडली होती दरम्यान स्वबळाच्या निर्णयामुळे पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे. दरम्यान भाजपच्या वतीने सुनिता पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना रिंगणात उतरवले असून भाजपच्या वतीने पाचोरा शहरात शक्ती प्रदर्शन करत शनिवारीच सुचेता वाघ यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास आमदार किशोर पाटील व त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Byte किशोर पाटील शिवसेना शिंदे गट आमदार
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: