प्रथम क्रमांक विजेते...🏆⚔️🔥 | सव्यसाचि गुरुकुलम् | राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धा
Автор: Savyasachi Gurukulam
Загружено: 2023-10-22
Просмотров: 9853
सव्यसाचि गुरूकुलम् चा दणदणीत विजय..🏆💐
विजयादशमीच्या शुभ पर्वावर सव्यसाचि गुरुकुलम् प्रथम क्रमांकाने विजयी...🏆⚔️🗡️💐🌹
गेले तीन दिवस आपल्या कोल्हापूर मध्ये
#शाही_दसरा_महोत्सव निमित्त राज्यशासन आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने
#राज्यस्तरीय_मर्दानी_खेळ_स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 42 आखडांनी सहभाग घेतला होता. या सर्व आखाड्यामध्ये दोन फेऱ्या पूर्ण करून आपल्या
#सव्यसाचि_गुरुकुलम् ने
#प्रथम _क्रमांक पटकवला. या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर नगरीचे
#छत्रपती_श्री_शाहू_महाराज व
#जिल्हाधिकारी_मा_श्री_राहुल_रेखावर उपस्थित होते. यांच्या हस्ते
#मानाची_ढाल,
#सन्मानचिन्ह व
#75000_रु_रोख_धनादेश देऊन आपल्या सव्यसाचि गुरुकुलम् चा सन्मान करण्यात आला. तीन दिवस चाललेली ही मर्दानी रणधुमाळी काल रात्री उशीरा शांत झाली आणि त्या भयाण शांततेत प्रथम क्रमांकाचा बहुमान सव्यसाचि गुरुकुलम् च्या नावाचा उद्घोष झाला..!! सर्व मैदान टाळ्यांच्या गडगडाटाने दणाणून गेले पण आपली मुले शांत होती..!! काही वेळ काही कळलेच नाही कोणताही आरडाओरडा न करता शांतपणे व्यासपीठावर जाऊन शासनाने दिलेला बहुमान स्वीकारून जागेवर परतला. गेली अनेक वर्षे युद्धकलेच्या माध्यमातून अविरतपणे चाललेली युद्धासाधना आणि त्यामाध्यमातून देशकार्य...!! याचे फळ म्हणजे कालच्या स्पर्धेतील मिळालेले यश..!!
सर्वांच्या नजरेतून निरीक्षण आणि पंचांचे परीक्षणाच्या कसोटी पार करीत आलेल्या सर्व वास्तदांचे आशीर्वाद, गुरुवर्य कै.श्री सुरज ढोली आणि गुरुवर्य श्री विनय चोपदार सर यांचे मार्गदर्शन, आमचे परममित्र राजेश पाटील सर, संदीप लाड सर यांची मोलाची साथ, आदरणीय बंधू परागदादा निट्टूरकर, समाधान सोनाळकर यांचे बहुमूल्य सहकार्य, पु. श्रीगुरुजींची कृपा आणि आपल्या गुरुकुलवरील सर्वच विद्यार्थी यांची साधना आणि परिश्रम यामुळेच हे यश मिळाले.
राज्य पर्यटन विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून तब्बल 23 वर्षानंतर ही अशी भव्य दिव्य पातळीवर शासकीय स्पर्धा भरविण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे आणि सुखदेवजी गिरी, प्रमोद पाटील सर, आदित्यजी बेडेकर, माणिकजी मंडलिक, नंदकुमार बामणे, हेमंत साळोखे...इ सर्व प्रशासकीय समिती आणि ही स्पर्धा ज्यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने पार पडली ते नाना सावंत सर आणि पंडित अण्णा पोवार सर तसेच सर्व पंच, सर्व आखाड्याचे प्रमुख, वस्ताद आणि खेळाडू, आपल्या सर्वांचे अतिशय मनःपूर्वक आभार आणि चरणी प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻
बक्षिस वितरणाचा कार्यक्रम रात्री खूप उशिरा पार पडल्यामुळे आम्हाला गुरुकुलवरती पोहचायला 3:30 झाले. पण गुरुकुलातील सर्व मुलांनी अख्खी रात्र जागून पहाटे 3:30 च्या ब्रम्ह मुहूर्तावर माझे व आपल्या विजेत्या संघाचे आपल्या परंपरेनुसार स्वागत व पूजन केले.
बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम आम्ही आपली ही शौर्याची रणामर्दाची म्हणजेच शिवकालीन युद्धकलेची परंपरा अतिशय विपरीत स्थितीत ज्या आमच्या मागच्या पिढीने आमच्यापर्यंत निस्वार्थ आणि निरपेक्षपणे पोहचवली त्या सर्व वस्तादांच्या आरोग्याच्या समस्या आणि औषधोपचारासाठी कायमची ठेव म्हणून ठेवून त्यांच्या चरणी समर्पित करीत आहोत.
आजवरची युद्धकलेच्या माध्यमातून झालेली सेवा आणि मिळालेले यश हे दोन्ही श्री गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो.
आपल्या सर्वांना प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपलाच राष्ट्रबंधू
लखन जाधव
प्रधान आचार्य
सव्यसाचि गुरुकुलम्, वेंगरूळ.
ता. भुदरगड, कोल्हापूर.
🚩⚔️🚩
शिवकालीन युद्धकला
🚩🙏🏻🚩
हर हर महादेव
🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
Like❤️ ...
Comment 📃🖊️...
Share🤳...
Subscribe🔔...
the👉🏻 #savyasachi_gurukulam🛕 👈🏻
♦️FOLLOW ON ME :♦️
🔸YouTube : 👉🏻https://youtube.com/@savyasachiguruku...
🔸Instagram : 👉🏻https://instagram.com/savyasachi_guru...
🔸Facebook : 👉🏻https://www.facebook.com/profile.php?...
👉🏻https://www.facebook.com/lakhan.jadha...
🔸Google : 👉🏻Savyasachi Gurukulam https://g.co/kgs/QgBCJJ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: