Arvind Sawant : पूरग्रस्त शेतकर्यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत ह्यांचा मदतीचा हात..
Автор: Arvind Sawant
Загружено: 2025-10-10
Просмотров: 7447
सत्ताधार्यांची योग्य वेळ एकच असते... 'निवडणूकीची वेळ'! उन असो, वारा असो, पाऊस असो, वादळ... संकट असले की धावुन जाणे हे आमचे काम! - अरविंद सावंत
धाराशिव जिल्ह्यातील बेलगाव, इडा इ. गावांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने, शिवसेना नेते, खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने, महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, स्थानिक लोकाधिकार समिती, आणि जाणीव ट्रस्ट ह्यांच्या सौजन्याने सर्व जीवनावश्यक वस्तू तसेच दिवाळी फराळासाठी आवश्यक जिन्नस असलेल्या किटचे वितरण करण्यात आले.
23 किलोचे किट, 23 टन वस्तूंचे वाटप
जीवनावश्यक वस्तू तसेच दिवाळी फराळ जिन्नस यांचे एकत्रित 23 किलोचे हे किट असुन यामध्ये एकूण 23 टन वस्तूंचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, कडधान्ये, रवा, तेल, तूप, साखर, मैदा, बेसन, शेंगदाणे, पोहे, मसाले, मिठापासून आंघोळीच्या साबणापर्यंत सर्व जिन्नस समाविष्ट करण्यात आले आहेत.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ह्यात शुद्ध तुपाचा देखील समावेश असल्याचे पाहुन शेतकर्यांचे कुटुंबिय आनंदले.
सदर दौर्यादरम्यान ह्या भागातील उध्वस्त शेतांची तसेच पिकांची प्रत्यक्ष पाहणी देखील अरविंद सावंत ह्यांनी केली.तेथील लोकांना जनावरांसाठी चाऱ्याची आवश्यकता असल्याचे कळताच अरविंद सावंत ह्यांनी चारा, कडबा देखील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
ह्या आसमानी आणि सरकारी अनास्थेच्या सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे उभा असल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार श्री. ओमराजे निंबाळकर , आमदार श्री. कैलास पाटील,जिल्हाप्रमुख श्री. रणजीत पाटील, उपजिल्हा प्रमुख श्री. चेतन बोराडे, श्री. दिलीप शाळू महाराज, तसेच स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक आणि ‘जाणीव ट्रस्टचे सर्वश्री दिलीप जाधव, प्रकाश शिरवाडकर, बाळा साटम, संजय ढोलम, प्रदीप परब, दत्ता भोसले, महेश धुरी, मधुकर घाडी, शरद गीते, संजय भांबुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: