ज्वारीच्या पिठाची पौष्टिक ढोकळी ( Poshtik Jwarichi Dhokli )
Автор: Pallavi Shelar
Загружено: 2026-01-14
Просмотров: 21
🌾 ज्वारीची वाफवलेली ढोकळी व फोडणीचे वरण
🥣 ढोकळीचे साहित्य:
ज्वारीचे पीठ – 2 वाटी
रवा – 2 चमचे
बेसन – 2 चमचे
जिरे – 1 चमचा
ओवा (अजवाइन) – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
खाण्याचा सोडा – 1 पिंच
हिंग – 1 पिंच
मेथीची भाजी – 1 वाटी (बारीक चिरलेली)
कोथिंबीर – 1 वाटी (बारीक चिरलेली)
कांद्याची पात – 1 वाटी (बारीक चिरलेली)
तेल – 3 चमचे
पाणी – मळण्यासाठी लागेल तेवढे
🍳 ढोकळीची कृती:
एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ, रवा, बेसन घ्या.
त्यात जिरे, ओवा, मीठ, खाण्याचा सोडा, हिंग घाला.
मेथीची भाजी, कोथिंबीर, कांद्याची पात व तेल घालून सगळे नीट मिसळा.
थोडे थोडे पाणी घालत घट्ट पीठ मळून घ्या.
हाताने पीठाचे ढोकळीच्या आकाराचे तुकडे / वड्या तयार करा.
स्टीमरमध्ये किंवा इडलीपात्रात 20 मिनिटे वाफवून घ्या.
ढोकळी शिजली की बाजूला ठेवा.
🍲 फोडणीचे वरण
साहित्य:
तुरीची डाळ – 1 वाटी
पाणी – 1 ग्लास
जिरे – 1 चमचा
मोहरी – 1 चमचा
लसूण – 5–6 पाकळ्या (ठेचलेल्या)
कढीपत्ता – थोडा
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
टोमॅटो – 1 (बारीक चिरलेला)
कोथिंबीर – सजावटीसाठी
तेल / तूप – फोडणीसाठी
मीठ – चवीनुसार
🍳 वरणाची कृती:
तुरीची डाळ धुऊन 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या.
कढईत तेल/तूप गरम करा.
त्यात मोहरी, जिरे घाला.
मोहरी तडतडल्यावर लसूण, कढीपत्ता, कांदा घालून परतवा.
टोमॅटो घालून थोडे शिजू द्या.
शिजवलेली डाळ घाला.
त्यात 1 ग्लास पाणी घालून 2 उकळ्या काढा.
वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
🍽️ सर्व्ह करण्याची पद्धत:
वाफवलेली ढोकळी प्लेटमध्ये ठेवा.
त्यावर गरमागरम वरण ओता.
वरून तुपाची धार सोडा.
गरमागरम वाढा 😋
#ज्वारीचीढोकळी
#JwarichiDhokli
#HealthyMarathiRecipe
#TraditionalFood
#RuralRecipe
#SteamedFood
#WeightLossRecipe
#HealthyEating
#MilletRecipe
#JowarRecipe
#MarathiFood
#DesiFood
#HomeMadeFood
#VillageStyleCooking
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: