कोकणचे खेळे २०२४ 😍 || सुरवात बेनी बुद्रुक गावच्या शिमगोत्सवाची ||
Автор: Kokankar Banti
Загружено: 2024-03-21
Просмотров: 2193
कोकणचे खेळे २०२४ 😍 || सुरवात बेनी बुद्रुक गावच्या शिमगोस्सवाची ||
#viral #vlog #trending #public #youtube
होळीच्या दिवसात कोकणात सादर केला जाणारा एक प्रमुख लोकोत्सव. या उत्सवात फक्त पुरुष सहभागी होऊन पारंपरिक संगीत,नृत्य,अभिनय आणि हस्तकलांचे आविष्करण घडवितात. मूळ संस्कृत सुग्रीष्मक या शब्दापासून शिगमो या शब्दाची उत्पत्ती सुगिम्मअ,सुगीम्म,शिगमो अशी झाली,असे मानतात.कोकणात आणि महाराष्ट्रात याला शिमगा म्हणतात. शिगमो हा कष्टकरी समाजाचा महत्त्वपूर्ण लोकोत्सव आहे. शिगमो फाल्गुन शुद्ध नवमीला सुरू होऊन पौर्णिमेला संपतो, उत्सव पौणिमेला सुरू होऊन रंगपंचमीला समाप्त होतो.काही गावातून तो पुढील दहा दिवसांपर्यंत चालतो.
शिगमो मांडावर नमन घालून सुरू होतो.मांड म्हणजे गावाच्या सामूहिक मालकीची मध्यवर्ती ठिकाणी परंपरेने राखून ठेवलेली पवित्र जागा.मांडागुरू स्थळाचे दैवत.गावातील सगळी पुरुषमंडळी नवमीच्या संध्याकाळी मांडावर जमून तेलवात लावतात आणि मांडागुरू तसेच स्थानिक दैवते व ग्रामदैवताला आवाहन करतात.नमनाच्या गीताला शिवड किंवा शिंवर असे म्हणतात.गड्यांना त्यांचे सहकारी सावरतात. उधळण्याची परंपरा आहे.
शिगमोत्सवाला भारत सरकारने राष्ट्रीय उत्सव म्हणून मान्यता दिली असून संस्कृतिसंवर्धन आणि पर्यटनाला उत्तेजन देण्याच्या हेतूने गोवा शासनाने १९८९ सालापासून राज्यपातळीवर शिगमोत्सव साजरा करण्याची योजना कार्यरत केली. त्यात चित्ररथ आणि लोकनृत्यांच्या पथकांचा मोठा सहभाग असतो.
#shimgautsav ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: