Geet Dnyaneshwari | गीत ज्ञानेश्वरी, ओवी गीत क्र. ९, एवं तामस जेवणारा (तामसगुणी आहार वर्णन)
Автор: Geet Dnyaneshwari
Загружено: 2024-03-22
Просмотров: 236
गीत ज्ञानेश्वरी, ओवी गीत क्र. ९, एवं तामस जेवणारा (तामसगुणी आहार वर्णन)
ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायामध्ये तामस गुणी माणसाच्या आहाराचं अतिशय समर्पक वर्णन दिलेलं आहे. त्यातल्या काही निवडक ओव्यांचं हे गाणं. या गाण्याला आम्ही नाट्यमय आणि पाश्चिमात्य चाल दिलेली आहे परंतु ती "तामस" या विषयाला अनुरूप म्हणजे dark अशीच आहे.
ओव्यांचा सारांश - संत ज्ञानेश्वर, तामसी आहाराचं वर्णन करताना बीभत्स रसाचा अवलंब करतात - कारण हे वर्णन ओंगळवाणं आहे, आपल्याला घृणा वाटेल असं आहे. असा हा तामसी माणूस खूप दिवसाचं शिळं, कोरडं पडलेलं, सडलेलं किंवा किडे पडलेलं (गाभीणे) अन्न खातो. त्याला जे प्यायचे नाही ते प्यावेसे वाटते, जे खायचे नाही तेच खावेसे वाटते. त्याला त्याज्य गोष्टी ग्रहण करण्याची अतिशय हाव सुटलेली असते. असे घाणेरडेपणाने, जेव्हा तो अन्न खातो तेव्हाच त्याला सुख प्राप्त झाल्यासारखे वाटते, परंतु तेवढ्याने या पाप्याला तृप्ती लाभत नाही. असे हे पोट भरणे म्हणजे जेवणे नव्हे तर पोटातुन दुःख यातनांना म्हणजेच रोगराईला निमंत्रण देणेच असते. म्हणून तामसी अन्न खाण्याचे परिणामही भयंकर असतात, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो.
--
परितोषची सुट्टी संपून तो अमेरिकेत परत जाण्याच्या आदल्या दिवशी हे गाणं पूर्ण होतंय याचे आम्हाला मोठे समाधान आहे. नेहमी प्रमाणे गीत ज्ञानेश्वरीला, आजच्या तरुण पिढीला रुचेल असे संगीत देण्यामध्ये परितोषचा वाटा फार मोठा आहे !
या आधी आम्ही "राजस आहार" या विषयावर देखील एक सचित्र ओवी गीत संगीतबद्ध केले आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
• गीत ज्ञानेश्वरी, ओवी गीत क्र. ६ तरी मारें ...
Concept, Original Compositions & Music, Singing
Dr. Dinesh Katre and Paritosh Katre
---------------------------------------
गीत ज्ञानेश्वरी : नादचित्रांची रुपडी
संकल्पना * संगीत * गायन
डॉ. दिनेश कात्रे आणि परितोष कात्रे
Contact: [email protected]
Copyright 2024 © All Rights Reserved
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: