चुकीची टीका खपवणार नाही! भाजप-राष्ट्रवादी आक्रमक
Автор: Sthairya
Загружено: 2026-01-14
Просмотров: 14664
फलटणमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विविध नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. नगरपालिकेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी बीबीच्या जाहीर सभेत मुक्ताफळे उधळल्याचा आरोप करत, “समशेरदादा हिमतीने नगराध्यक्ष झाले असून जो जिता वही सिकंदर असतो,” असे ठामपणे सांगितले.
रणजितसिंह भोसले म्हणाले की, निवडणुकीतील पराभवाचे नैराश्य मनात धरून चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे. विकासासाठी आग्रही असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका रोखणे चुकीचे आहे.
भाजपा पश्चिम विभाग तालुकाध्यक्ष अमोल सस्ते यांनी, जनतेने नाकारलेल्या लोकांनी खालच्या पातळीवर बोलू नये, अन्यथा त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. राष्ट्रवादी शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना असल्याचे सांगत, फलटणचा विकास निश्चित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
नगरसेवक सचिन अहिवळे आणि संदीप चोरमले यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांवर शिंतोडे उडवण्याचा निषेध करत, चुकीचा नरेटिव्ह थांबवण्याची मागणी केली. भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, माजी नगरसेवक सनी अहिवळे आणि वल्लभ हेंद्रे यांनीही चुकीच्या वक्तव्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचा इशारा दिला.
या पत्रकार परिषदेतून विरोधकांना स्पष्ट संदेश देण्यात आला की, परिवर्तन स्वीकारा आणि विकासाच्या आड येऊ नका.
अशाच थेट, निर्भीड आणि स्थानिक राजकीय बातम्यांसाठी दैनिक स्थैर्य YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले मत कमेंटमध्ये नोंदवा.
#स्थैर्य #फलटण #मराठीन्युज #BJP #NCP #पत्रकारपरिषद #स्थानिकराजकारण
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: