Kolhapur | आबिटकर शिवधनुष्य पेलतील का?
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2025-11-06
Просмотров: 10063
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आपल्या पक्षाच्या गटनेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. शिवसेना पक्ष मेळावा हा आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे आता शिवसेनेचे धनुष्यबाण पेलणार काय, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. एकनाथ शिंदे कोल्हापूर दौरा आणि त्यांच्या उपस्थितीत झालेला मेळावा यामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरणं अधिक रंगतदार झाली आहेत.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले प्रकाश आबिटकर हे सध्या कोल्हापुरातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना अपेक्षित पाठबळ न मिळाल्याने त्यांच्यासमोरचे आव्हान अधिक वाढले आहे. या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आबिटकरांचा करिष्मा झळकतो की हे रणांगण त्यांच्यासाठी संकट ठरते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
#KolhapurPolitics #hasanmushrif #satejpatil #mahadik #prakashabitkar #eci #ncp #shivsena #cm #dcm #Eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthakare #mnc
#ZillaParishadElection #MaharashtraPolitics
#LocalBodyElections #Mahayuti
#MahavikasAghadi #PoliticalPodcast
#Sakalaam #AkshayJahagirdar
#KolhapurNews #PoliticalAnalysis
#MarathiPodcast #Election2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: