पाषाणावर जिवापाड छिन्नी हातोड्याचे घाव घालून आपल्यासमोर सादर करणाऱ्या त्या शिल्पकारांना त्रिवार वंदन
Автор: Rupak Sane
Загружено: 2024-12-05
Просмотров: 1299
पाषाणावर जिवापाड छिन्नी हातोड्याचे घाव घालून त्याचे अलंकार करून आपल्यासमोर सादर करणाऱ्या त्या अज्ञात अनामिक शिल्पकारांना त्रिवार वंदन.
महाराष्ट्राबाहेर भारतभरात आवर्जून पाहायला जावी अशी मंदिरं, राजवाडे वाडे, मशिदी, कबरी, अनेक आहेत. जसे की ताजमहाल, कुतुबमिनार, लाल किल्ला, उदयपूर अशा अनेक इमारती म्हंजे वस्तु शास्त्रातील आश्चर्य आहेत.
कर्नाटक राज्यातील हम्पी हे तर दगडातून सकारलेला स्वर्गच आहे.
पण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाषाणशिल्प, विहार, चैत्य, लेणीं, शिळामंदिरें डोंगरदर्यातल्या काळ्याकभिन्न खडकांत जागोजागी खोदलेली आहेत. या बाबतींत आपला महाराष्ट्रा इतर प्रांतापेक्षा मोठा आहे ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे.
अथक परिश्रम घेऊन खोदलेल्या ह्या अश्या लेण्या, विहार, चैत्य, गुहा घडवत असताना शिल्पकरांना केवढं अवधान राखावं लागलं असेल. छिन्नी हातोड्याचे घाव घालताना तिथला दगड जीवापाड जपावा लागला असेल, कारण एकदा छिन्नी मारली किती वज्रलेप झाली, चुकीचा झालेला घाव पुन्हा भरून काढता येणार नाही. केवढं भान ठेवावं लागलं असेल त्यांना.
हे पाषाणातले अलंकार पाहताना तंत्रज्ञानांनचेही डोळे वीस्फारले जातात. कलाप्रेमींचे मन आदराने भरून येतं, पण विशेष म्हणजे ह्या अद्भुत अज्ञात शिल्पकारांनी त्यावर कुठेही आपली नावं कोरलेली नाहीयेत. हे केवढं आश्चर्य.
तसं पाहिलं तर काळा पाषाण ही काही मोठी देखणी वस्तू नाही, आपण त्याला दगड म्हणतो कारण त्यातून भाव प्रगट व्हावे असे सुद्धा काही नाही. पण याच पाषाणांना फोडून शिल्पकारांनी विविध मूर्तींच्या मुद्रांमधून कसे भाव उमटवले आहेत, अनेक अलंकार घडवले आहेत, हे पाहिल्यावर थक्क व्हायला होतं.
त्रिमूर्तीतील शिवाच्या मुद्रेवरचे गांभीर्य, पार्वतीच्या मुद्रेवरील सलज्ज भाव, सारं काही अंगप्रत्यंगातून प्रकट होताना दिसत. केवढ्या त्या प्रचंड मूर्ती, कशी त्यांची प्रमाणबद्धता हे सगळं अतर्क्य आहे.
लेण्यांमधील चित्रकलेचेही असंच आहे.
अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये चित्रांचे दीड दोन हजार वर्षांपूर्वीचे रंग पण अजूनही अगदी ताजे ताजे वाटतात. या सगळ्या चित्रांमधलं अवयवरेखन, प्रमाणबद्धता, भावदर्शन, प्रसंगांची मांडणी, त्यातली समज आणि कौशल्य केवळ अलौकिकच आहे.
बुद्धाला घातलेली भिक्षा, आरशात आपले रूप न्याहाळत असलेल्या अप्सरेच्या चित्रात तिचे अलंकार, केशरचना सारं सारं काही दृष्ट लावणारं आहे.
नाशिकची पांडवलेणी, भाजे, कार्ले, कान्हेरी, जुन्नर इथली शिल्प पाहताना त्यांची भव्यता आणि सुबकता आपल्याला खेळवून ठेवते.
महाराष्ट्रातल्या बहुतेक प्रत्येक डोंगर रांगेत कुठे ना कुठेतरी अशी कातळ शिल्प, पाण्याची कुंड आणि कोरीव काम आढळून येतं. पुण्याजवळ भामचंद्राच्या डोंगरात, भंडारा डोंगरात, घोराडेश्वरच्या डोंगरात, तिकडे घारापुरी, औरंगाबाद, जुन्नर अशा नाना ठिकाणी खीळवून ठेवणारं शिल्पकाम आहे.
आपला सगळा सह्याद्री हा ज्वालामुखीच्या रसापासून बनलेला आहे. त्यात कठीण असा एकसंध काळा पाषाण जागोजागी आहे. त्याला हेरून शिल्पकारांनी आपले छिन्नी हातोडे चालवून त्यांना अलंकृत केल. त्यांच्या मदतीला बौद्ध भिक्षू आणि धनिक धावून आले. भिक्षुंना नगरापासून दूर राहून प्रार्थनेसाठी, अभ्यासासाठी, आराम करण्यासाठी चैत्य हवे होते. सह्याद्रीच्या शरीरावर असे हे अलंकार त्यांनी सजवले. त्यांचं मोल फार मोठं आहे.
उत्तरेत डोंगर आणि पाषाण नाही म्हणून हे सगळं विटा रचून करावे लागत होतं.
जसा हा सारनाथचा स्तूप.
सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण, यादवांची राजधानी देवगिरी ही मराठवाड्याने गर्व मानावा अशी ठिकाणं आहेत.
वेरूळला ब्राह्मणी, जैन आणि बौद्ध या तिन्ही प्रकारांची लेणी आहेत.
या लेण्यांमधल्या खोल्या एका ओळीतच असत असं नाही, जसा जसा खडक उपलब्ध होईल तशा या कमी अधिक उंचीवर, तर कधी कमी अधिक खोल असायच्या.
जुन्नरचा लेण्याद्री, मानमोडी ह्या अशा जातीच्या असंख्य लेण्यांचं एक पोळच आहे.
काही लेण्यांमध्ये उत्तर काळी अनेक देवतांची स्थापना होत गेली.
जश्या या लेण्यां तशीच शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेली देवळे आणि मंदिरही आपल्या महाराष्ट्रात आहेत. वेरूळ जवळचा घृष्णेश्वर, सिन्नरचा गोंदेश्वर, पुण्याजवळचा भुलेश्वर, कोल्हापूर जवळचा कोपेश्वर ह्या पाय खिळवून ठेवणार्याण कलाकृती,
पण सध्या यांच्याकडे पाहताना मात्र एक औदासिन्य दाटलेलं दिसतं. आता दुःख एवढेच आहे की यातल्या अनेक मूर्तींना अपाय केला गेलाय, हत्तींच्या सोंडा तोडल्या गेल्यात, अनेक मूर्तींची मस्तकं विच्छन्न केली गेलीयेत, स्त्री मूर्तींना विद्रूप केलं गेलंय. परिसरात प्रचंड कचरा केला गेलाय. ह्या वास्तू आणि शिल्प हा आपल्याला मिळालेला वारसा आहे ही भावना न ठेवता केवळ एक मौजमजेच, उन्मादच, उपभोगाचे ठिकाण आणि केवळ स्वतःचे फोटो काढण्यासाठी बॅकड्रॉप म्हणून हया कडे पाहिले जातय.
अस जरी असलं तरी अजूनही नव्या पिढीतील अनेक कला,वास्तुशास्त्र,इतिहास यातील विद्यार्थी आणि संशोधक मुलं मुली मोठ्या आदराने इथे जाताना दिसतात. त्याची ऊर्जा वाढावी म्हणून त्यांच्याचसाठीच हा व्हिडिओ.
इथे जताना ज्या अज्ञात कलाकारांनी त्याच्या श्रमाला, संकल्पाला, कामातल्या विशालतेला, त्यात दडलेल्या सौंदर्य आणि अभिरुचीला मूर्त स्वरूप आणून आपल्याला हा वारसा दिला याची जाणीव ठेवून आपण त्या ठिकाणांवर नतमस्तक होऊन त्यांच रक्षण केलं तरच पुढच्या पिढीला हे पाषाणातील अलंकार अनुभवता येतील.
तसं झालं नाही तर आपण त्यांच्यासाठी काय ठेवून जाणार आहोत, याचा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे.
माझ्या चॅनलला subscribe, like, share करा.
मोबाईल - 9420444969
[email protected]
/ @rupaksane
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: