पाण्यावर थापलेली ज्वारी नाचणीची भाकरी बनवण्याची टिप्ससह सविस्तर पद्धत । Diabetes Special Bhakri
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2020-09-14
Просмотров: 3169570
डायबिटीज स्पेशल भाकरी | Diabetes Special Bhakri | Jwari Nachnichi Bhakri | How To Make Perfect Bhakri | ज्वारी नाचणीची भाकरी | Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य – ३ कप ज्वारी नाचणीचे मिक्स पीठ, चिमूटभर मीठ आणि १½ कप पाणी.
कृती – संपूर्ण पीठ चाळणीने चाळून घ्या. ( चक्कीतून आणल्यावर त्यात थोडाफार कचरा असतो व तो पीठ मळताना आणि खाताना दाताखाली कचकचतो म्ह्णून पीठ चाळून घेणे अधिक उत्तम ). सांगीतल्याप्रमाणे एका भांड्यात पिठाच्या अर्धे ( उदा २ कपसाठी १ कप पाणी आणि २½ कपसाठी १¼ कप पाणी ) प्रमाणात पाणी, मीठ घालून चांगले उकळून घ्यावे. आता यात सर्व पीठ टाकून पिठाची उकड करून घ्यायची आहे. साधारण २ मिनिटे सर्व पीठ उकळत्या पाण्यात घोटून घ्यावे आणि नंतर घ्यास बंद करावा. आता हे तांदळाच्या उकडीचे सर्व पीठ एका परातीत किंवा किचन प्लॅटफॉर्मवर काढून घ्या. पीठ मळण्यासाठी आणि भाकरी थापण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करावा. हातात मूठभर साधे पाणी घेऊन पिठात टाकावे. आता पीठ मळण्यास सुरुवात करावी. हाताला पिठाचा अंदाज घेऊनच थोडे थोडे साधे पाणी टाकावे कारण पीठ मऊसर होई पर्यंत मळायचे आहे. ( साधे पाणी जर जास्त प्रमाणात पिठात गेले तर भाकरी वळताना ती सारखी फाटत राहील. ).
पीठ आता रगडून रगडून चांगले मळून घ्यावे. मळून झालेले पीठ एका थाळीत किंव्हा किचन प्लॅटफॉर्मवर काढून घ्यावे. साधारण दोन हातात मावेल इतका पिठाचा गोळा घ्यायचा. त्याला पुन्हा थोडे मळून घ्यावे. आता भाकरी थापण्यासाठी किचन प्लॅटफॉर्मवर पाणी घ्या ( साधारण ४ चमचे ). त्या पाण्यावर पुन्हा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यावा. पिठाला शंखासारखा त्रिकोणी आकार द्यावा . वरील त्रिकोणी बाजूस थोडे दाब द्यावे. आता या पिठाला दोन्ही हातात घेऊन गोल गोल फिरवून थोडी मोठ्या आकारात पसरवावी. आता किचन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तेवढेच पाणी घ्यायचे आहे जेवढे अगोदर पीठ थापण्यासाठी घेतले होते.
पाणी प्लॅटफॉर्मवर चांगले सर्व बाजूने पसरवून घ्यावे. आपल्या तळ हाताच्या साहाय्याने तीला गोल आकार देत मोठ्या आकारात करून घ्यावी. गोल आकारात वळवताना भाकरीचे काठ मोडून घ्यावे. आता भाकरीला उचलून तीची मागील बाजू देखील सारख्याच पद्धतीने मोठी करून घ्यावी. ( मागील बाजू म्हणजे भाकरी उलटून तीची दुसरी बाजू नव्हे. ज्या बाजूस आपण गोल आकार करत तीच्या आकाराला मोठे केले आहे त्याची विरुद्ध दिशा. भाकरी उचलल्यावर जर ती तुटून खाली पडत नसेल तर समजावे कि आपले पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण अगदी योग्य आहे. जर तुमचे प्रमाण चुकले तर भाकरी हातात घेताच क्षणी तिचे दोन तुकडे होतील. ) भाकरी आता तिच्या संपूर्ण बाजूने गोल आकार देत मोठी करून घ्यावी. आता भाकरीच्या संपूर्ण एकाच बाजूस हाताची सर्व बोटे उमटून घ्यावीत. आता भाकरी पहिला सारखी हातात घेऊन ज्या बाजून आपली बोटे उमटवली आहेत प्रथम ती बाजू खाली ठेवून तीला तव्यावर अथवा खापरीवर शेकविण्यासाठी ठेवावी. भाकरी शेकविण्याआधी गॅस ची आच मोठी ठेवावी आणि तवा चांगला तापवून घ्यावा. साधारण १ मिनिटे एका बाजूने शेकवून घ्यावी.
२ मिनिटे झाल्यावर तीला उलटून तिची दुसरी बाजू देखील शेकवून घ्यावी. दुसरी बाजू शेकवत असताना तुम्हाला भाकरी फुगताना दिसेल. साधारण हि भाकरी दोन्ही बाजूने चांगला ताव देऊन ५ ते ७ मिनिटापर्यंत चांगली भाजून निघते. आता भाकरी टोपलीत किंव्हा मलमलच्या कपड्यावर काढून घ्यावी. गरमागरम भाकरी तय्यार ! हि भाकरी तुम्ही मस्त मासळीचा रस्सा, झणझणीत गावरान मटण चिकन सोबत खाऊ शकता.
#DiabetesSpecialBhakri #bhakrirecipe #rotirecipe
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...
If you liked the video, Please Like & Share.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: