Karunashtake | सज्जनगड दैनंदिन उपासना | Ravindra Narewadikar
Автор: Raghav Narewadikar.
Загружено: 2023-10-26
Просмотров: 305004
|| श्रीराम ||
राष्ट्रगुरू म्हणून समर्थ रामदास सर्व महाराष्टाला वंदनीय आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीयच नव्हे तर प्रशंसनीय आहे. समर्थांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. ग्रंथराज दासबोध जीवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो. श्री आत्माराम व मनाचे श्लोक विवेक व वैराग्याची शिकवण देतात. रामदासांचे अभंग व करुणाष्टके रामावरील अतूट भक्तीचे द्योतक आहेत. समर्थांची करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तीरसाने भरलेली आहेत. संसारतापाने होरपळून निघणाऱ्या मनाला शांतता लाभावी म्हणून यांत ते “ जळत ह्रदय माझे जन्म कोटयानुकोटी। मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी” अशी विनवणी करतात. ”तुजवीण रामा मज कंठवेना “ या करुणाष्टकात “ आम्हा आनाथा तूं एक दाता। संसारवेथा चुकवी समर्था “ अशी प्रार्थना करतात. “बुध्दि दे रघूनायका” या करुणाष्टकात आपल्या व्यक्तिमत्वाचे परखड परिक्षण करून रघुनाथाकडे सद्गुणांची ,सावधानतेची.भिक्षा मागतात.त्यातून त्यांची विनयशीलता व विचारशक्ती दिसून येते. करुणाष्टके म्हणजे करुण-रसाने भरलेली आठ भक्तीगीते. ही एकदा वाचली की, रोजरोज परत परत परत म्हणावीशी वाटतात..
|| जय जय रघुवीर समर्थ ||
#karunashtake #samartha #sajjangad
1:03 अनुदिन अनुतापे
7:15 तुझा दास मी
10:40 रामावर भार
13:22 रघुनायका मागणे हेचि आता
16:48 बुद्धी दे रघुनायका
22:24 समर्थांच्या जीवीचे आर्त
26:54 समर्थांना पडलेले कोडे
33:22 समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे
गायन - स.भ. रवींद्र नरेवाडीकर.
ध्वनिमुद्रण - राघव नरेवाडीकर.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: