संविधानवादी विरुद्ध संविधानविरोधी, फैसला व्हायलाच हवा:Prakash Aambedkar यांचं विधान
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-26
Просмотров: 1521
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संविधान दिनानिमित्त 'संविधानवादी विरुद्ध संविधानविरोधी' असा देशव्यापी राजकीय लढा उभारण्याचे आवाहन केले आहे. 'संविधानवादी एका बाजूला आणि संविधानविरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला पाहिजे,' असे ते म्हणाले. अयोध्येतील ध्वजारोहणाचा संबंध त्यांनी १९५० च्या नागपूरमधील घटनेशी जोडला आणि आरएसएसने संविधान कधीच स्वीकारले नाही, असे म्हटले. मुंबईतील मतदार यादीतील घोळावर बोलताना, त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. हेमंत करकरे यांच्या मृत्यूसंदर्भात उज्ज्वल निकम यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, मुंबई तोडण्याच्या राज ठाकरेंच्या आरोपावर बोलताना, त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या राजकारणासाठी जबाबदार धरले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा आणि उमेदवार पळवापळवी होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
#PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #VBA #SaamTV #MarathiNews #ConstitutionDay #SamvidhanDiwas #RSS #BJP #HemantKarkare #UjjwalNikam #Mumbai #RajThackeray #UddhavThackeray #MaharashtraPolitics #BMCelection #IndianPolitics #Ambedkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: