ST चे शासनात विलीनिकरण | आस्था आणि अवस्था
Автор: Shivthar Tech
Загружено: 2021-11-15
Просмотров: 244
st कामगार आंदोलन
प्रमुख मागण्याराज्य सरकारमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं विलीनीकरण करावं यासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पगारवाढ अशा चार प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 4 नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन करताहेत. कर्मचारी आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
दुसरीकडे वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापलेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
कर्मचारी संपावर गेल्यानं बहुतांश ठिकाणची एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात बाहेरगावी गेलेले नागरिक अडकून पडले असून, त्यांना महागड्या खासगी वाहतूक सेवेचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे हा संप लवकरात लवकर संपावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान कर्मचारी मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
विलीनीकरणाची मुख्य मागणी मान्य न झाल्याने कर्मचारी संतप्त आणि नाराज झाले आणि त्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं कर्मचारी सांगितलं.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे (MSRTC) राज्यभरात 16,000 बसेस आणि 96,000 कर्मचाऱ्यांचा ताफा असून, दररोज सुमारे 68 लाख प्रवाशांना बससेवा दिली जाते. कोरोनाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला. कोरोना काळापूर्वी महामंडळाचे नुकसान 3,500 कोटी रुपये होतं, ते 9,000 कोटी रुपयांच्या वर गेलं असल्यानं महामंडळाला इतर खर्च आणि वेतन देणं कठीण झालं. त्यामुळे कोरोना काळात कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळाला नाही.
#ShivTharTech
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: