Chavand fort | चावंड किल्ला | Junnar
Автор: Vishal Mule
Загружено: 2018-11-15
Просмотров: 829
**************Follow us on Social Media*****************
Facebook : / thevishalmulevlogs
Instagram : / vishalmulevlogs
चावंड किल्ला Chavand Fort – ३४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
इतिहास : १) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुऱ्हाण निजामशाह ( इ.स. १५९०-१५९४ ) हा सातवा निजा, याचा नातू बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६२६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला. त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानातील नाव अहे. प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी लूट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदारच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला.
चामुंडा अपभ्रंशे चावंदा जयावरी सप्तकुंड ॥ गिरी ते खोदूनी अश्मखंड । प्रसन्नगडा मार्ग निर्मिला ॥ जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
गडावर जाण्याचा वाटा :गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोट्या तोफेची नळी जमिनीत पुरली आहे.
CREDIT:
Kynemon -
Happy • Видео
#chavandfort #JunnarFort #VishalMuleVlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: