निंबोळी अर्क तयार करणे...!
Автор: शाश्वत शेती SA
Загружено: 2020-07-14
Просмотров: 38392
निंबोळी अर्क तयार करण्याची अत्यंत सोपी आणि साधी योग्य पद्धतीने पद्धत...!
निंबोळी अर्क कसा तयार करावा?
घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत
Nimaark kaisa banaye
निमार्क कैसे बनाये?
जैविक कीटकनाशक- निंबोळी अर्क
कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत
निंबोळी पावडरचा पाण्यामधून काढलेला अर्क म्हणजेच निंबोळी ५% अर्क
– आज सर्वत्र कीड नियंत्रणामधील स्वस्तातले वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून वापरतात.
या अर्कचा वापर भाजीपाला पिके, तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्ये, कपाशी अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये कीडनाशक म्हणून केला जातो.
निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत:-
निंबोळ्यांची बारीक पावडर करुन घ्यावी.
निंबोळ्य़ा गोळा केलेली नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास, बाजारात मिळणारी निंबोळी पावडरचा उपयोग अर्क बनविण्यासाठी करता येतो. वर्षभर अशी निंबोळी पावडर बाजारात उपलब्ध असते. फ़वारणीसाठी नैसर्गिक घटकांचा अर्क हा ५ टक्क्यापर्यंत काढला जातो.
५ टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी
५ किलो निंबोळी भुकटी फ़डक्यात बांधून किंवा मोकळी ९ लिटर पाण्यात बादलीत पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. व २०० ग्रॅम साबण चुरा १ लिटर पाण्यात भिजत ठेवावा.
निंबोळी भिजविताना बादली व्यवस्थित झाकून ठेवावी.
त्याचबरोबर निंबोळी पावडर भिजविण्यासाठी थंड पाणी वापरावे. कारण गरम पाण्याने निंबोळी अर्कामधील सक्रिय घटक कमी होऊ शकतात.
रात्रभर निंबोळी पावडर पाण्यात भिजल्यानंतर व्यवस्थित फ़डक्याने गाळून घ्यावे.
गाळून काढलेली निंबोळी पावडर एखाद्या झाडाला खत म्हणून टाकावी. गाळून घेतलेल्या पाण्यात साबणाचे १ लिटर पाणी मिसळून १० लिटर द्रावण होईल असे पाहावे. अशा प्रकारे १० लिटर अर्क तयार होईल.
हे द्रावण १ लिटर/१० लिटर पाण्यात मिसळून याप्रमाणे फवारणी करावी.
यामुळे फ़वारणी व्यवस्थित पिकावर पसरुन उत्तम परिणाम मिळतील.
निंबोळी अर्काचे होणारे फ़ायदे:-
१) संपूर्णपणे नैसर्गिक स्रोतांपासुन तयार होत असल्यामुळे खर्च अतिशय कमी येतो.
२) निंबोळी अर्काच्या फ़वारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. सर्व प्रकारच्या पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने नियमीत फ़वारणी घेतल्यास, रस शोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते
३) किडींच्या जीवनचक्रामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासुन परावृत्त केले जाते तसेच रसशॊषक किडींचेदेखील अंडी
नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा येतो. त्यामुळे एकूणच जीवनचक्रामध्ये अडथळा येतो.
४) नैसर्गिक घटक असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही.
यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये वापर करण्यास सुलभ आहे. निर्यातीसाठीच्या भाजीपाला पिकामध्येदेखील याची फ़वारणी फ़ायदेशीर ठरते.
५) कीटकनाशकांसोबतदेखील वापरता येत असल्या कारणाने तसेच एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीमध्ये वापरण्यास अगदी सोपे असे हे नैसर्गिक कीडनाशक आहे.
६) पांढरी माशी, मावा, फ़ुलकिडे, विविध प्रकारच्या अळ्यांचे देखील नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. मोठ्या अळ्यांचे नियंत्रणात निंबोली अर्काची जास्त मदत होत नाही यासाठी अळी लहान अवस्थेत असतानाच निंबोळी अर्काची फ़वारणी करावी.
असेच नवनवीन व्हिडिओ माहिती मिळविण्यासाठी आमच्या शाश्वत शेती समूहात सहभागी व्हा.
शाश्वत शेती SA फेसबूक ग्रुप JOIN करा 👇लिंक
/ 282781736449537
शाश्वत शेती SA Yutube चॅनेल SUBSCRIBE करा👇लिंक
/ @shashwatshetisa
शाश्वत शेती SA फेसबुक पेज LIKE Follow करा 👇 लिंक
/ shaashwatshetisa
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: