अडबंगनाथ 108 मनका भाग 2 shree Kshetra adbangnath sansthan BHAMATHAN Shrirampur
Автор: अडबंगनाथ दर्शन (adbangnath darshan)
Загружено: 2025-07-20
Просмотров: 1192
श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामा नगर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
प्रभू रामचंद्र च्या व लक्ष्मणाच्या अश्रूंनी पवित्र पावन झालेली भूमी म्हणजे श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ आले होते त्यावेळेस सीतेचा शोध घेत असताना राम अतिशय संकटात होते ज्यावेळेस मारीच मामा हरणीच्या रूपा मध्ये पुढे पळू लागले मग ते हरीण पुढे पळत असताना राम हरणीच्या मागे पळू लागले त्यानंतर हरणीने एक कमाल केली कमाल अशी केली अरे लक्ष्मण मुझे बचाव असा आवाज रामांच्या आवाजामध्ये त्या हरणीने काढला मग तो आवाज या भूमीतून नाशिक पंचवटी या ठिकाणी गेला त्या ठिकाणी कुटियामध्ये लक्ष्मण आणि सीतामाई हे दोघे होते सीतामाईला तो आवाज आला त्या लक्ष्मणाला म्हणाल्या अरे लक्ष्मण तुम्ही कुछ आवाज सुनाई दे रही क्या लक्ष्मण त्यावेळेस म्हणतात नाही भाभी मुझे तो कोई आवाज नही दे रही है परत तो आवाज येऊ लागला अरे लक्ष्मण जे बचाव रे लक्ष्मण मुझे बचाव तो आवाज लक्ष्मणाला आला त्यावेळेस तिथे माय लक्ष्मणाला म्हणाले तुम आपके भाई संकट में उनका तुम रक्षण करणे को जाये लक्ष्मण म्हणाले माझ्या भावाने जगाच संकट दूर करण्याकरता अवतार घेतलेला आहे ते कस काय संकटात पडतील तरी सीतामाता ऐकायला तयार नाही सीतेमातेंना राग आला आणि त्या लक्ष्मणाला फार खाली येऊन बोलले तुला काय वाटलं राम मरावे आणि मी तुझी व्हावी हे कदापि शक्य नाही मी माझ्या रामांना शोधायला चालले असे म्हटल्यानंतर लक्ष्मण म्हणाले मी जातो पण तुम्ही हा लक्ष्मण रेखाच्या बाहेर तुम्ही प्रवेश करू नका असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जसे राम आले या भूमीमध्ये तसेच लक्ष्मण पण आले असे पाच ठाण आहे कोकमठाण, मातुलठाण, नागमठाण, बाजाठाण, भामाठाण भामानगर असे हे स्थान आहे राम या ठिकाणी येऊन थांबले आणि सीतेच्या शोधार्थ रडू लागले जसे राम आले तसेच मागून लक्ष्मण पण आले त्या दोघांची ज्या ठिकाणी भेट झाली ते स्थान म्हणजे अडबंगनाथ संस्थान भामानगर ते दोघी रडू लागले रामांना कळाले होते की रावणाने सीतेला पळून नेले ते दोघी रडत असताना त्यांचे अश्रू जमिनीवर पडले त्या अश्रूंची ओली माती भिजली आणि त्या मातीतून स्वयंभू शिळा प्रगट झाली ही शिळा श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी आहे पुढे माणिक नावाच्या शेतकऱ्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली त्या माणिकाचे नाव अडबंगनाथ असे ठेवले अडबंगानात हे गोरक्षनाथांचे शिष्य ज्यावेळेस गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होते त्यावेळेस माणिकाच्या शेतामध्ये ते आले त्यावेळेस माणिक शेतकरी नुकताच जेवायला बसलेले होते जेवायला बसलेले असताना त्या ठिकाणी ते पहिला घास उचलणार तर आवाज आला अलख निरंजन आदेश असा आवाज आल्यानंतर त्या माणिक शेतकऱ्याने समोर बघितले समोर गोरक्षनाथ उभे होते गोरक्षनाथ म्हणाले अरे बाळा मी पाच दिवसापासून उपाशी आहे मला तू खायला अन्न प्यायला पाणी दिलं तर खूप बरं होईल माणिक शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता त्यांना आपली शिदोरी पूर्ण दान दिली त्यांनी ती शिदोरी खाल्ली मन तृप्त झाले आणि ते गोरक्षनाथ म्हणाले अरे मालिका मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय मागायचे आहे ते मागून घे माणिक शेतकरी म्हणाले अरे जोगड्या तूच माझ्याकडून अन्न घेतलं तूच माझ्याकडून पाणी पिला आणि आता तूच म्हणतोय तुला काय पाहिजे ते मागून घे मला काही नको तुला काही अजून लागले तर सांग गोरक्षनाथ म्हणाले मागू का माने शेतकरी आणि मागा ते म्हणाले मला तुझे मन दे असं म्हणल्यानंतर त्यांनी कोणत्या क्षणाचा विचार न करता त्यांनी मन पण दान देऊन टाकले मन दान केल्यानंतर गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघून गेले नंतर माणिक शेतकरी उठून उभे राहिले त्यांच्या मनात विचार आला की आता आपण आपल्या कामाला लागू पण त्यांच्या मनात आलं की आपण मन योगेश्वराला दान केल आहे त्यांनी तसेच बारा वर्ष उभे राहून त्या रानाच्या अश्रूंच्या शिळेवर तपश्चर्या केली मग बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तिघीनाथ आले त्यांनी माणिकाला दीक्षा दिली आणि त्या दीक्षित नाव अडबंग असे ठेवले त्यांना आशीर्वाद दिला की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझी कीर्ती महान राहील अडबंगनाथांची भारतभरामध्ये 52 ठिकाणी आहे त्यापैकी जन्मभूमी कर्मभूमी तपोभूमी ही भामानगर आहे
याच ठिकाणी स्वामी अरुणनाथगिरी महाराज मठाधिपती आहेत तसेच या दोन्ही इतिहासाचा उल्लेख नवनाथ ग्रंथांमध्ये 33 व 34 व्या अध्याय मध्ये या ठिकाणचा उल्लेख आहे तसेच रामायण ग्रंथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख आहे आपण नक्की अशा रामांच्या लक्ष्मणच्या अश्रूंनी पवित्र झालेल्या यात भूमीला नक्कीच भेट द्यावी आदेश जय अडबंगनाथ..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: