Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

उदगीर किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात सुंदर भुईकोट किल्ला | Udgir Fort | संपूर्ण माहिती | Drone Shots

Автор: Sachin Puri Vlogs

Загружено: 2022-09-28

Просмотров: 191626

Описание:

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून लातूरपासून ६५ किमी. अंतरावर वसले आहे. उदगीरच्या आसपास पसरलेल्या टेकड्यांना ‘उदयगिरी’ हे नाव असावे, त्यावरून ‘उदगीर’ हे नाव पडले, असा एक मतप्रवाह आहे. तसेच उदगीर किल्ल्यातील उदागीर बाबांच्या नावावरून उदगीर हे नाव अस्तित्वात आले असावे, असे म्हटले जाते.
उदगीरचा किल्ला ज्या टेकडीवर वसलेला आहे, ती टेकडी एका खोल दरीतील दोन खोऱ्यांच्या आत आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला व पूर्वेला या खोऱ्यांचे फाटे फुटलेले आहेत, तर उत्तरेला मोठी दरी आहे. म्हणजेच पूर्व, पश्चिम व उत्तरेस नैसर्गिक खोरे व दक्षिणेस उदगीर शहर वसलेले आहे.
उदगीर शहराच्या उत्तरेस चौबारा ते किल्ला वेस या मार्गाने पुढे भुईकोट किल्ला दिसतो. किल्ल्याभोवती खंदक असून सर्वत्र त्याची उंची व रुंदी समान दिसत नाही. खंदक पार करून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी खंदकावर एक दगडी पूल आहे. खंदकाची भिंत दगडी असून उदगीरच्या पश्चिमेस असणाऱ्या तलावातील पाणी यात सोडण्याची व्यवस्था होती. 
उदगीरवर वेळोवेळी यादव, काकतीय, बहमनी, बरीदशाही, निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, मोगल, मराठे व हैदराबादच्या निजामांनी राज्य केले. यादव राजा दुसरा सिंघण (कार. १२१०–४६) याच्या कारकिर्दीत उदगीर ‘अंबादेश’ मंडळातील देशविभागाचे स्थान होते. याचा एक उल्लेख यादवांच्या राजवटीतील सेनापती खोलेश्वर याच्या अंबाजोगाई येथील १२२८ (शके ११५०) च्या एका शिलालेखात ‘उदगिरी’ या नावाने आलेला आहे. उदगीर हे काकतीयांच्या सरहद्दीवरील ठाणे असल्यामुळे तेथे यादव सैन्याची छावणी होती. काकतीयांच्या गणपती नावाच्या राजाने उदगीरवर ताबा मिळविल्याचा उल्लेख त्याच्या उपरपल्ली शिलालेखात (इ. स. १२३५) आलेला आहे. यादवांनी हा प्रदेश पुन्हा परत मिळविला, अशी माहिती कान्हरदेव यादवाच्या १२५८ च्या कान्हेगाव लेखातून मिळते. कान्हरदेवाच्या राजवटीत उदगीरदेश हे लातूर मंडळातील गोपाल राष्ट्रौड याच्या अधिकार कक्षेत समाविष्ट होते. महानुभाव साहित्यातील नोंदीवरून व महिकावतीच्या बखरीनुसार रामचंद्र यादवाचा पुत्र भिल्लम (सहावा) हा यादव राजवटीच्या अखेरीस उदगीरचा शासक असल्याची माहिती मिळते.
चौदाव्या शतकात हा भाग बहमनी राजवटीच्या ताब्यात गेला. उदगीर येथील किल्ला कधी व कोणाच्या राजवटीत बांधला याची ठोस माहिती मिळत नाही. या किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख बहमनी सुलतान शिहाबुद्दीन महमूद (कार. १४८२-१५१८) याच्या काळात मिळतो. दस्तूर दिनार या सरदाराचे बंड यशस्वीपणे मोडून काढल्याप्रीत्यर्थ कुली कुतुब यास वैयक्तिक खर्चासाठी त्याने हा किल्ला एका वर्षासाठी दिला होता. १४९२ मध्ये कासीम बरीदलाही औसा आणि कंधार येथील किल्ल्यांबरोबर उदगीरचा किल्ला जहागिरी म्हणून दिल्याचा उल्लेख मिळतो.
पुढे कासीम बरीदने आपला पुत्र अमीर बरीदला हा किल्ला दिला (१५०४). बहमनींच्या विघटनानंतर १५१७ मध्ये बरीद आणि माहूरचा जहागीरदार खुदावंदखान हबशी यांच्यात उदगीर येथे लढाई होऊन हबशी मारला गेला व किल्ला पुन्हा अमीर बरीदच्या ताब्यात राहिला. अमीर बरीदच्या काळात आदिलशाहीबरोबर संघर्ष सुरू झाला होता. अमीरच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अली बरीदशाह सुलतान बनला. त्याच्या काळात बुऱ्हाण निजामशहाने उदगीर किल्ला जिंकून नंतर इमादशाहाकडे सुपुर्द केला (१५४८). परंतु इमादशाहाने दयाभाव दाखवून पुन्हा तो बरीदकडे सुपुर्द केला. त्यानंतर बरीच वर्षे हा किल्ला बरीदशाहीकडे राहिला. त्यानंतर मुर्तझा निजामशहा (कार. १५६५–१५८८) याने तो निजामशाहीत समाविष्ट करून घेतला.
खान दौरान या मोगल सरदाराने निजामशाहीकडून हा किल्ला घेतला (१६३६). तसेच मोगलखान कोका याची या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नियुक्ती केली गेली (१६३७). तसा उल्लेखही किल्ल्यातील एका कमानीवरील फार्सी शिलालेखात आहे. १७२४ पर्यंत सजावरखान उल्मुल्क, खातमखान व अन्य मोगल उदगीर किल्ल्याचे किल्लेदार होऊन गेले. १६८५ मध्ये खातमखानाने या किल्ल्यात काही वास्तू बांधल्या संबंधीचा एक शिलालेख आहे. १७१५ मध्ये मोगल-मराठे यांच्यात तह होऊन या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले होते. १७२४ मध्ये हा किल्ला निजामाकडे गेला. १७६० मध्ये येथे मराठे व निजाम यांच्यात उदगीरची प्रसिद्ध लढाई झाली. यात मराठ्यांनी निजामाचा पराभव करून तहात ६० लक्ष रुपयांचा मुलूख मिळवला. परंतु पुढच्याच वर्षी पानिपतच्या लढाईच्या संकटामुळे या तहाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मराठ्यांकडून या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले होते. १८१९ व १८२० मध्ये निजाम राजवटीविरुद्ध मराठवाड्यात बंड झाले. त्यांपैकी उदगीर येथील देशमुखांचे बंड प्रसिद्ध आहे. १८२० मधील या उठावात देशमुखाने हा किल्ला बळकावला होता. १९४८ साली उदगीर स्वतंत्र भारतात सामील केले गेले.
  / sachinpurivlogs  
  / fort_adventure_official  

Facebook -   / sachinpurivlogs  

Contact us: [email protected]

Do not forget: Like, Share and Subscribe.

Thank You For Watching.

Ignore Tags👇
#trekking #sahyadri #climbing #climber #adventure #adventures #adventuretime #trekkinglovers #trekvlog #viral #viralvideo #trekkingvlogs #gadkille #forts #fortsofindia #fortsinmaharashtra #maharashtra #maharashtra_desha #maharashtrian

उदगीर किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात सुंदर भुईकोट किल्ला | Udgir Fort | संपूर्ण माहिती | Drone Shots

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Потерянную могилу Клеопатры нашли, заглянув внутрь учёные закричали от yжaca…

Потерянную могилу Клеопатры нашли, заглянув внутрь учёные закричали от yжaca…

САМЫЕ БОЛЬШИЕ И САМЫЕ ОПАСНЫЕ ГОРЫ КАВКАЗА

САМЫЕ БОЛЬШИЕ И САМЫЕ ОПАСНЫЕ ГОРЫ КАВКАЗА

Бескрайние древние карьеры Месопотамии, часть 11

Бескрайние древние карьеры Месопотамии, часть 11

Тайны жизни кротов: что их так тянет на наши участки?

Тайны жизни кротов: что их так тянет на наши участки?

Дон: От истока до устья | Интересные факты про реку Дон

Дон: От истока до устья | Интересные факты про реку Дон

Новости Сегодня 27.11.2025 - ЧП, Катаклизмы, События Дня Москва, Таиланд Индия США Европа

Новости Сегодня 27.11.2025 - ЧП, Катаклизмы, События Дня Москва, Таиланд Индия США Европа

udgir railway station | udgir railway gate | 🚉 Vlog - 15 ❤️

udgir railway station | udgir railway gate | 🚉 Vlog - 15 ❤️

Ankai Tankai Fort | Manmad Nashik | अंकाई -टंकाई |व्यापारी मार्गावर लक्ष्य ठेवणारा महत्वाचा किल्ला

Ankai Tankai Fort | Manmad Nashik | अंकाई -टंकाई |व्यापारी मार्गावर लक्ष्य ठेवणारा महत्वाचा किल्ला

TOP 5. Моссад. Невозможное

TOP 5. Моссад. Невозможное

Сванети: как живут свободные грузины | Грузия

Сванети: как живут свободные грузины | Грузия

Кто на самом деле строил Кронштадт

Кто на самом деле строил Кронштадт

मुडागड किल्ला | एवढ्या आत जंगलात हा गड कसा काय 😯 | Mudagad fort | kolhapur

मुडागड किल्ला | एवढ्या आत जंगलात हा गड कसा काय 😯 | Mudagad fort | kolhapur

Lohagad Fort Details | Lohagad Fort |  किल्ले लोहगड | Lohagad Fort Information

Lohagad Fort Details | Lohagad Fort | किल्ले लोहगड | Lohagad Fort Information

सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1

सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1

Что скрывает АРМЕНИЯ? Самая недооценённая страна в мире.

Что скрывает АРМЕНИЯ? Самая недооценённая страна в мире.

1200КМ ПЕШКОМ! БОЛЬШАЯ ПРОГУЛКА ПО КАВКАЗСКОЙ ТРОПЕ | От Каспийского моря до Черного моря | ЧАСТЬ 1

1200КМ ПЕШКОМ! БОЛЬШАЯ ПРОГУЛКА ПО КАВКАЗСКОЙ ТРОПЕ | От Каспийского моря до Черного моря | ЧАСТЬ 1

Римские акведуки — лучше современного водопровода?

Римские акведуки — лучше современного водопровода?

Следы древних машин | Древняя тяжелая техника (сборка)

Следы древних машин | Древняя тяжелая техника (сборка)

गावातील 125 वर्षे जुन्या घरात राहिले | निसर्ग भटकंती | Heritage Homestay | Kokan Beach Homestay

गावातील 125 वर्षे जुन्या घरात राहिले | निसर्ग भटकंती | Heritage Homestay | Kokan Beach Homestay

Самые красивые места, каждой области Украины  |  Путешествия, Туризм

Самые красивые места, каждой области Украины | Путешествия, Туризм

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]