PILES
Автор: DR. RAJAN PATIL
Загружено: 2023-02-09
Просмотров: 304
मूळव्याध .....
मूळव्याध हा गुदमार्गात होणाऱ्या व्याधींपैकी एक महत्त्वाचा व्याधी आहे. सामान्यत: गुदमार्गात तीन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. यांना वैद्यकीय भाषेत Hemorrhoidal Veins म्हणतात. या घड्याळ्याच्या काट्यानुसार ३,७ आणि ११ वाजल्याप्रमाणे स्थित असतात. चुकीचा आहार व विहार घेतल्याने या रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते व त्या फुगतात. यालाच मुळव्याध असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा यालाच मूळव्याध अथवा पाइल्स म्हटलं जातं. मूळव्याध झाला आहे की नाही हे अनेकदा रुग्णाला समजण्यास वेळ लागतो. मूळव्याध झाल्याची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत. ती दिसल्यास तात्काळ उपचार करावा.
शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे
शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे
शौचाच्या ठिकाणी खाज येणे
शौचाच्या वेळेला मांसत भाग बाहेर येणे
कारणे –
मलाबष्टंभ अथवा बद्धकोष्ठता (Constipation)
अती तिखट, अती तेलकट तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे
मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन
सततचे बैठे काम
अती जागरण
जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा
कोरडे आणि शिळे अन्न खाणे
अनुवांशिक
सीसोदे हेल्थ केअर चे री-पील (Re-Peel) हे मूळव्याध वर एक उत्तम औषध आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: