डाळिंब पानगळ नंतर पुढील नियोजन श्री सुशांत हिरालाल सुर्वे dalimb pangal niyojan
Автор: Sushant Survey🍎
Загружено: 2020-10-06
Просмотров: 66545
ज्यांनी पानगळ केली आहे किंवा आता करणार आहेत त्यांनी आजचा वरील व्हिडीओ व त्याआधी टाकलेला पानगळ समंधित व्हिडीओ नक्की बघावा, आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील...व्हिडीओ पूर्ण बघावेत व मग त्यात काही प्रश्न असल्यास मग फोन करावा. व्हिडीओ न बघता प्रश्न विचारू नका...
ज्यांना माती परीक्षण करायचे आहे त्यांनी खालील पत्त्यावर सॅम्पल पाठवावे. सॅम्पल कसा घ्यावा याचा व्हिडीओ देखील आपल्या चॅनेल वर उपलब्ध आहे. ज्यांनी सॅम्पल पाठवले आहेत त्यांना रिपोर्ट झाला कि मेसेज केला जाईल. लॅब ओपनिंग आता मागील 4-5 दिवसांतच झाले असलेने आता सॅम्पल चेकिंग ला सुरुवात झाली आहे, लवकरात लवकर रिपोर्ट व वॉटर सोल्युबल टाईमटेबल व बेसल डोस विषयी आपल्याला माहिती दिली जाईल. काही सॅम्पल खूप लवकर आले होते पण लॅब लेट चालू झालेने रिपोर्ट येण्यास वेळ लागला आहे त्याबद्दल दिलगिरी
ज्यांना पेड कन्सल्टन्सी प्रोग्रॅम बद्दल माहिती किंवा तो प्रोग्रॅम जॉईन करायचा असेल त्यांनी उद्या ग्रुपवर जो फॉर्म टाकला जाईल तो भरावा...त्यांना देखील पूर्ण माहितीदेण्यासाठी प्रयत्नशील आहोत
मनुष्यबळ अभावी कदाचित काही गोष्टी काही रिप्लाय लेट येऊ शकतात त्याबद्दल लवकरच सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत.
दिवाळी नंतर आपल्याला ग्रुपमध्ये नवीन बदल जाणवेल, आपल्याला या डाळिंबशेती बद्दल नवीन गोष्टी / नवीन माहिती अगदी डिटेल मध्ये देण्यासाठी व त्यायोगे कमीत कमी खर्चात निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्यासाठी मदत होईल अशी माहिती तयार होत आहे
तसेच,
पिकविण्यासोबत विक्री मध्ये देखील तुम्हाला हातभार लावण्यासाठी आपण जानेवारी 2021 पासून जयकिसान कृषी FPC तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, काही ठराविक सदस्य घेऊन...डाळिंबशेतीतील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यातील काही लोकांची सोबत घेऊन आपण यासाठी प्रयत्न करणार आहोत, ज्यायोगे आपल्याला योग्य भाव व हर एक प्रकारचे डाळिंब योग्य पद्धतीत भावात विकले जावे यासाठी आपला प्रयत्न असणार आहे.
ग्रुपच्या माध्यमातून, सर्वांच्या सोबतीने आपल्याला मोठे काम करावयाचे आहे...त्यायोगे आपल्या सर्वांची साथ व प्रेम नेहमी सोबत असू द्यावे.
जयकिसान कृषी संगमनेर पत्ता:
जयकिसान शेतकरी सल्ला व सुविधा केंद्र
अनारकिंग इनोव्हेटिव्ह ऑर्गेनिक्स
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कुल समोर
हॉटेल स्टेट्स जवळ, संगमनेर नाशिक रोड
मु. अमृतनगर पोस्ट घुलेवाडी
तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
पीन : 422 605
मोबाईल नंबर : 8484-82-5411
वरील पत्त्यावर आपण माती परीक्षण साठी 500 ग्राम सॅम्पल पाठवू शकतात, शिवाय जे शेतकरी भेटीसाठी येणार आहेत त्यांनी वरील पत्त्यावर भेट घ्यावी...येण्याअगोदर किमान 2 दिवस आधी कॉल करावा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: