लहानांपासून ते अगदी मोठ्याना आवडेल असा साधा सोपा मटार पुलाव/बिर्याणी
Автор: अस्मिता मराठी -घरचे जेवण
Загружено: 2025-10-12
Просмотров: 29
मटार पुलाव- बिर्याणी
साहित्य:-
दीड ते दोन वाटी कुठल्याही चांगल्या कंपनीचा बिर्याणी- पुलाव तांदूळ, उकडून घेतलेले मटार( frozen मटार सुद्धा चालतील) , 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून, आले- लसूण पेस्ट, जिरे, हळद, अर्धा चमचा लालतिखट , बिर्याणी- पुलाव मसाला, कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृती:-
सर्वप्रथम तांदूळ 3/4 पाण्यात स्वच्छ धवून 15 मिनिटे भिजत ठेवा सोबतच तांदूळ शिजवण्यासाठी पाणी एक बाजूला गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ नीट भिजून होईल , मग त्यातला पाणी निथळून उकळी आलेल्या पाण्यात 80% शिजवून घ्या, तांदूळ शिजल्यानंतर भात चाळणीत निथळत ठेवा व वरून थोडा गार पाणी घाला म्हणजे भात शिजण्याची प्रक्रिया बंद होईल व आपण शिजवलेला भात नरम पडणार नाही ( पुलाव - बिर्याणीसाठी भात फडफडीत लागतो).
नंतर गॅसवर मंद आचेवर एका टोपात 2/3 चमचे तेल घालून जिऱ्याची फोडणी द्या. नंतर बारीक चिरलेला कांदा व आले लसूण पेस्ट घालून कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत शिजवून घ्या. कांदा थोडा शिजला की त्यात टोमॅटो घालून मिश्रण पुन्हा एकदा शिजवून घ्या व नंतर त्यात उकडलेले मटार घाला.
एक वाफ आल्यावर हळद, लालतिखट , धने-जिरे पूड , गरम मसाला घाला व मिश्रण पुन्हा एकदा परतून त्यात थोड पाणी घालून एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर त्यात एक ते दीड चमचा बिर्याणी- पुलाव मसाला घालून एकजीव करा व वरून शिजलेला भात व चवीनुसार मीठ घाला. ( मीठ बेताने घाला कारण readymade बिर्याणी मसाल्यात मीठ सुद्धा असते).
सर्व मिश्रण नीट एकजीव करा व मंद आचेवर एक वाफ येऊ द्या. वरून कोथींबीर पेरून गरमागरम पुलाव- बिर्याणी दही रायत्यासोबत सर्व्ह करा. ( जर तुम्हाला white पुलाव बनवायचा असेल तर सगळे मसाले वर्ज्य करा. फक्त मसल्यामध्ये धने जिरे पूड व अगदी थोडा गरम मसाला घाला)
माझी ही साधी मटार पुलाव - बिर्याणी ची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेल ला नक्की like करा, subscribe करा व जास्तीत जास्त share करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: