धीर धरा भक्तजन करू नका घाई.
Автор: Pratima Sawle - Muktai Bhajan Mandal
Загружено: 2025-11-11
Просмотров: 336
धीर धरा भक्तजन करू नका घाई
भविष्याची चिंता तुमच्या घेतील साई ||धृ||
संसाराचा ताप साहवेना आता
काम क्रोध मोह यांची मजवरी सत्ता
सर्वस्व अर्पियले मी आपुल्या पायी ||1||
दाखवा हो मार्ग मज सांगा काय करू
द्यावी पायी जागा देवा नको दूर सारू
तात माता बंधू भगिनी तू माझी साई ||2||
सर्व साक्षी अग्नी देव द्वारकामाईत
विभूतीचा प्रसाद भक्तांना देत
साईचे दर्शन भक्त आनंद देई ||3||
गीत - श्रीमती प्रभा ओर्पे.
संवादिनी व गायन - प्रतिमा सावले.
तबला व संगीत - श्रीधर घाणेकर.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: