सरकारने आरक्षणामध्ये जरांगे पाटलांना फसवलं ?
Автор: आवाज महाराष्ट्राचा Official
Загружено: 2025-12-14
Просмотров: 230
अंतरवाली सराटीपासून वाशी आणि मुंबईपर्यंत मराठा आरक्षणासाठी उभारलेलं आंदोलन राज्यभर गाजलं. लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि या आंदोलनाचा चेहरा ठरले मनोज जरांगे पाटील. मात्र आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय – सरकारने काढलेला शासन निर्णय (GR) प्रत्यक्षात मराठा समाजाच्या किती उपयोगी ठरलाय?
हैदराबाद गॅझेटरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर झाला, पण महिन्यांनंतरही अत्यल्प प्रमाणात प्रमाणपत्रे मिळाल्याचं वास्तव समोर येत आहे. मोठ्या घोषणा, जीआर आणि समित्या असूनही जमिनीवर परिस्थिती फारशी बदललेली नाही, असा आरोप मराठा समाजातून होत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी ठरले का? की सरकारच्या प्रक्रियेत मराठा समाज अडकलाय? ओबीसी आरक्षणावर होणारा संभाव्य परिणाम, प्रशासनाची संथ गती आणि प्रत्यक्ष आकडेवारी या सर्व मुद्द्यांवर या व्हिडिओत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
तुमचं मत काय आहे? मराठा आरक्षणाच्या या लढ्याचं पुढे काय होणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी
आपल्या *आवाज महाराष्ट्राचा* या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 🙏
#MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaAndolan #MarathaSamaj
#KunbiCertificate #GRNews #MaharashtraPolitics #DevendraFadnavis
#OBCReservation #MarathiNews #BreakingNews #Rajkaran
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: