डॉक्टर संपदा मुंडे अन् आगवणे प्रकरण, माढ्याचे माजी खासदार अडचणीत, फलटणचा आका कोण?
Автор: S PRIME NEWS
Загружено: 2025-10-28
Просмотров: 2007
S PRIME NEWS
डॉक्टर संपदा मुंडे अन् आगवणे प्रकरण, माढ्याचे माजी खासदार अडचणीत, फलटणचा आका कोण?
माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या दोन गंभीर प्रकरणांमुळे अडचणीत आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा आणि दिगंबर आगवणे कुटुंबाला कथितरित्या झालेल्या त्रासाचा समावेशय. या दोन्ही प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणि सत्तेच्या गैरवापराचे अत्यंत गंभीर आरोप झाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदा घेऊन या आरोपांना धार आणली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. हे प्रकरण केवळ आत्महत्येपुरते मर्यादित न राहता, डॉ. मुंडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे याला गंभीर राजकीय वळण लागले. या संपूर्ण प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव अप्रत्यक्षपणे जोडले गेले असून, राजकीय दबावामुळेच डॉ. मुंडे यांना त्रास दिला गेला, असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे. दुसरे महत्त्वाचे प्रकरण म्हणजे दिगंबर आगवणे कुटुंबाला कथितरित्या झालेल्या त्रासाचे आहे. आगवणे कुटुंबाने थेट निंबाळकर यांच्यावर सत्ता आणि पदाचा गैरवापर करून त्रास दिल्याचा आरोप केला आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, त्यांच्यावर मोकळा सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांनी पत्रकार परिषदेत भावनिक होऊन सांगितले की, जो त्रास डॉ. संपदा मुंडे यांना झाला, त्याच त्रासातून त्यांचे कुटुंब मागील दोन वर्षांपासून जात आहे. या त्रासाला कंटाळून कुटुंबातील दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. माजी खासदारांनी आपल्या सत्ता आणि पदाचा गैरवापर करून त्यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले, असा स्पष्ट आरोप पीडित कुटुंबाने केलाय.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: