बुलढाण्यात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला; दोन जण पोलिसांच्या ताब्यात | Bogus Voting Attempt Foiled
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-01
Просмотров: 64222
बुलढाण्यात बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक शाळेत दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींना पकडण्यात आले आहे. 'दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी ही दोघेजण आले होते', असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पकडण्यात आलेल्या व्यक्तींनी सुरुवातीला आपली नावे सांगण्यास टाळाटाळ केली, मात्र नंतर त्यांनी कोथरू गावातून आल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून संबंधितांना ताब्यात घेतले आहे. राज्यात बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि संवाद आता समोर आला आहे.
#Buldhana #BogusVoting #MaharashtraElection #SaamTV #MarathiNews #Crime #ElectionCommission #PoliceAction #VotingScam #FakeVoters #Democracy #LawAndOrder #MaharashtraPolitics #NewsUpdate #BreakingNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: