मोहटादेवी | mohta devi |full video |mohta devi temple pathardi | mohta devi ahmednagar
Автор: Jagruti Aute
Загружено: 2021-11-20
Просмотров: 26210
मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे.. हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.
पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या मोठ्या मंदिराशिवाय मोहटादेवीचे आणखी एक छोटेसे मंदिर टेकडीवर आहे. या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोईंनीयुक्त असे दर्शनरांगेसह बांधकाम झाले आहे. या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले होते. मंदिरांच्या शिलाखंडांवर दीड वर्षे नक्षीकाम, कोरीव काम सुरू होते. मंदिरांचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले आहे. या नक्षीकामासाठी १५ कारागीर कामाला लावले होते. आजही २०१५ साली या मंदिर परिसरात देवस्थान विकासांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
१० एकर परिसरात, सुमारे २५ कोटी रुपयांच्या देवीभक्तांच्या देणग्यांमधून व दानांमधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले जात आहे. या देवस्थानाच्या आवारात पाच मजली इमारत, भक्त निवास, भोजनकक्ष, व्हीआयपींच्या निवासाची सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीचे चेअरमन, पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय वगैरे उभारली असून कीर्तन, भजन यांसाठी एक भव्य मंडप उभारला आहे.
देवीची आरती दिवसभरात तीन वेळा होते. पहाटे ५ वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो. सकाळी ७ वा. पहिली आरती, दुपारी १२ वा. आणि सायं.७ वा. महाआरती केली जते. भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले असते. नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितील भाविक करतात. १५ दिवसांचा हा भक्तिउत्सव असतो. मोहटागडाच्या पायथ्याला असणार्या मोहटा गावातून देवीची पालखी, मिरवणूक आयोजित केली जाते.
नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे. रझाकाराच्या काळात मोहटा गावात म्हशीचोरीची आख्यायिका आहे त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही.
या देवस्थानाचे माहात्म्य सांगणारे पप्पू खान यांनी ’जय रेणुका माता’ व उद्योगपती रमेश खाडे यांनी ’मोहट्याची देवी रेणुकामाता’ हे मराठी चित्रपट काढले आहेत.
#mohtadevi #mohtadevitemple #mohtadevipathardi #mohtadevidarshan
#mohtadeviaai #navratri
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: