गोष्ट एका टोपीवाल्याची | केवड्याच्या पानांच्या टोप्या | सातारा | unseen places | caps | केवडा
Автор: Shailesh P. Karandikar
Загружено: 2020-10-10
Просмотров: 1724
गोष्ट एका टोपीवाल्याची
केवड्याच्या पानांची टोपी
The man manufacturers the caps from Pandanus Odoratissimus. Really amazing.
अनवट वाटेवरच्या भटकंतीने खरच आयुष्य खूप समृद्ध केलयं. वेगवेगळे प्रदेश, चालीरीती, संस्कृती, भाषा, पशुपक्षी अशा अनेक गोष्टी मनाला भुरळ पाडतात. अशा वाटांवर भेटणारी माणसे पण तशीच अनोखी. अशाच एका वाटेवर चालताना एक टोपीवाला भेटला. त्याची ही गोष्ट.
लहानपणी ऐकलेली टोपी बनवणाऱ्या माणसाची आणि माकडांची गोष्ट अजूनही बऱ्याच जणांच्या लक्षात असेल. पण असे कधीही वाटले नव्हते की असा टोपीवाला प्रत्यक्षात भेटेल.
असेच एकदा साताऱ्याजवळ मोरघळ ला भटकायला गेलो होतो. तेथे वास्तव्यास असणाऱ्या विठ्ठलभाऊंनी एकदा त्या परिसरात टोपी बनवणाऱ्या एका व्यक्ती बद्दल सांगितले होते त्यामुळे ह्या वेळी टोपीवाल्याला भेटायचेच होते.
तर हा अवलिया टोपीवाला म्हणजे सर्जेराव जाधव. ह्यांचे वडील इरल्या बनवायचे. ( लोक उन्हापावसापासून संरक्षण मिळण्यासाठी गवत किंवा बांबूपासून बनवलेली ही इरली डोक्यावर घ्यायचे ) ह्यांचा मूळ व्यवसाय म्हणजे कपडे शिवणे. पण वडिलांकडून मिळालेला इरली बनवण्याचा वारसा ते केवड्याच्या पानापासून तयार करून टोप्या तयार करून पुढे चालवत आहेत.
टोप्या बनविण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे. केवड्याची पाने डोंगराच्या कड्यातून जाऊन तोडून आणायची म्हणजे मोठे धाडसाचे काम. कारण एक तर तिथे जायचे म्हणजे अवघड वाट आणि शिवाय सापांची फार भीती. केवड्याच्या पानामध्ये सापांचा खूप वावर असतो असा समज आहे. सर्जेराव तेथून केवड्याची पाने तोडून घरी आणतात आणि त्यानंतर त्याचे काटे काढणे म्हणजे अग्निदिव्यचं. काटे काढताना हाताला किती ठिकाणी खरचटले असेल त्याला सीमाच नाही. त्यानंतर त्याचे समांतर तुकडे करून ते त्याच्या वेण्या हाताने विणतात व ह्या सगळ्या वेण्या एकत्र शिवून टोपी तयार होते. ह्या सगळ्या उद्योगाला म्हणजे एक टोपी बनवायला दोन दिवस लागतात. खरच हा सगळा प्रकार खूप कष्टदायक आहे आणि त्यामानाने त्याचा मोबदला फारच कमी.
केवड्याचे आयुर्वेदिक गुणधर्म लक्षात घेतले तर इतर कोणत्याही टोपी पेक्षा ही टोपी घालणे जास्त चांगले.
ह्यांच्या कडे विविध आकाराच्या, विविध प्रकारच्या टोप्या मिळतात. जर कोणाला हव्या असतील तर खरच ह्या अवलिया कडून घ्यायला काय हरकत आहे ?
शैलेश करंदीकर
9822433201
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: