KALOPASAK

मी डाँ अलका सुरेश गुडधे (जोशी) . मी गणित या विषयात प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत कार्यरत होते. निवृत्त झाल्यावर काय? या प्रश्नाचे उत्तर शोधात असता मला असं लक्षात आलं कि आज तरुण पिढीला दोन सुयांचे विणकाम, एका सुईचे क्रोशे, टॅटिंग इ. कला शिकायला आणि त्याचा आनंद घ्यायला वेळच नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा शिकायची इच्छा होईल तेव्हा घर बसल्या internet या त्यांच्या आवडत्या माध्यमाद्वारे त्यांना शिकता आलं पाहिजे. हे प्रकर्षाने जाणवलं. तसंच ग्रामीण भागातल्या काही महिलांना या कला येतात पण त्यात अधिक कौशल्य संपादन करता यावं म्हणून त्यांच्यासाठी मराठीतून हे शिकता आलं पाहिजे म्हणून युट्युब चॅनल सुरु करायचं ठरवलं. मी "अलका अँड आर्टस्" या ब्लॉगची ब्लॉगर सुद्धा आहे.
आज महाराष्ट्र दिनी १ मे २०१८ ला हे चॅनल सुरु करत आहे.
या चॅनलचा प्रवास हा दोन्ही बाजुंनी असावा असं मला वाटतं म्हणून मी आपल्या प्रतिक्रिया,कॉमेंट्स यांची आतुरतेने वाट पाहत राहीन. आपला सहभाग मला उत्साह देत राहील.
तरी आपल्याला जर हे व्हिडीओ आवडले तर शेअर करायला आणि subscribe करायला विसरू नका.