Sneh Sawali Care Center

आजच्या धकाधकीच्या जीवनात आजारी व परावलंबी व्यक्तीला सांभाळणे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. कुटुंबात जर कुणी आजारी असेल तर अशा व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचा आहार, विहार, फिजिओथेरपी याशिवाय जखमांची ड्रेसिंग पाठीवर जखमा होऊ नये म्हणून काळजी इत्यादी. अनेक आव्हाने अशा व्यक्तींना सांभाळताना येतात. एखाद्या कुटुंबाची जरी इच्छा असली तरीही त्यांना सांभाळणे अवघडच नाही तरी अशक्यप्राय गोष्ट आहे. यांना सांभाळण्यासाठी डॉक्टरांची नर्सेसची व सपोर्टींग स्टाफची टीम घरी आणावी लागते. अशा परिस्थितीत शुश्रूषा केंद्र नर्सिंग केअर सेंटर हाच खरा मार्ग असतो. .समजा एखाद्याला पक्षाघात झाला तर त्यांना दवाखान्यात भरती करून आवश्यक असे उपचार सुरुवातीचे ३-४ दिवस असतात. त्यानंतर त्यांना फक्त नर्सिंग केअर ची गरज असते. उदा. त्यांना नळीवाटे अन्न देणे,, त्यांना बेडसोर होऊ नये म्हणून काळजी होते. त्यांच्याकडून फिसिओ थेरेपी करून घेणे, त्यांची urine/stool ची काळजी घेणे इत्यादी. ही सर्व कामे आमच्या नर्सिंग केअर सेंटरमध्ये अतिशय सवलतीच्या दरात केली जातात. विशेष म्हणजे हे सेंटर एक सामाजिक काम म्हणून चालवले जाते.