Aika Ho Aika

ऐका हो ऐका हे एक खास मराठी चॅनल आहे. जे क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन, पुणे यांच्या अंतर्गत काम करीत आहे. ऐका हो ऐका या पॉडकास्ट ची स्थापना एक नोव्हेंबर 2023 रोजी झाली.
या चॅनेलवर खूप वेगळा आणि भन्नाट कन्टेन्ट टाकला जातो. जो लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी देखील उपयुक्त आहे. हा चॅनेल मनोरंजनासाठी आणि माहिती संग्रहित करण्यासाठी सुरू केलेला आहे. यामधून आम्ही खूप रंजक कथा ज्या आजकालच्या काळात लुप्त होत चालले आहेत या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत. या लुप्त होत चाललेल्या ललित कथा, कथासंग्रह, कादंबऱ्या काही वर्षांनी फक्त ऐकिवात असणार आहेत. त्यामुळे त्याचे संग्रहीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ते ऐका हो ऐका या पॉडकास्ट वर आम्ही करत आहोत.