Vinit Joshi
संस्कृतीतील गमतीजमती - a serious business.
या चॅनेलवर मी वेगवेगळ्या विषयांवर बोलतो याचा अर्थ मी सध्या त्या विषयांचे वाचन करतो आहे. मी अभ्यासक पातळीला पोहोचायला बराच वेळ आहे. वाचतो त्यावर थोडाफार विचार करतो. माझ्या विचाराला चिंतन म्हणणे, म्हणजे पुलं म्हणतात तसे काजव्याला सूर्य म्हणण्यासारखे आहे. पण मांडलेली मते संपूर्णपणे माझी आहेत.
दुसरा मुद्दा, माझा चॅनेल हा संपूर्णपणे संस्कृतीशी संबंधित असेल. काही व्हिडिओ ज्याला आधुनिक मराठीत random म्हणतो तसे वाटतील. एखादी चित्रफीत कलेशी संबंधित असेल, एखादी संस्कृतीसंबंधी असेल, एखादा इतिहासासंबंधी असेल तर काही संतवाङ्मयाशी संबंधित असतील.
तुमच्या सूचनांचा आदर आणि विचार नक्की केला जाईल. आवडल्यास अमलबजावणीदेखील केली जाईल.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा.