साहित्यिक गप्पा आणि कविता - Shrikant Gopal Kale

केवळ करमणूक नाही तर विचारांनाही खाद्य म्हणजे साहित्यिक गप्पा आणि कविता - साहित्यातील व जीवनातील विविध विषयांवर भाष्य. व्यवसायाने अभियंते असणाऱ्या श्री.श्रीकांत गोपाळ काळे यांचे विचार या चॅनेलवर तुम्ही ऐकू शकाल.

श्रीकांत काळे
व्यवसायाने अभियंते, 48 वर्षांचा कार्पोरेट विश्वातील अनुभव.युरोप आणि अमेरिका इथे अनेकदा प्रवास. सध्या DSS तर्फे इंडस्ट्रियल सेफ्टी सल्लागार म्हणून कार्यरत. टाटा मोटर्स, जिंदाल स्टील वर्क्स, आदित्य बिर्ला या साठी सल्लागार म्हणून काम.
सन्मान (1) मराठी साहित्यसंमेलनात कविता वाचन (2) मुलुंड महानगर साहित्य संमेलनात कवितेचे विशेष पारितोषिक (3) ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या न्यासाने आयोजित केलेल्या "संन्यास म्हणजे निष्क्रीयता नव्हे" या निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक (4) लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले यांनी आयोजित केलेल्या पु. ल. देशपांडे श्रद्धांजली सभेत मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित (5)आचार्य अत्रे जन्म शताब्दी निमित्त आयोजिलेल्या आंतर राज्य काव्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक