पैस खांब नेवासे # ज्ञानेश्वर # श्रीकांत गोपाळ काळे # Dnyaneshwar Pais Khamb Newase @shrikantgkale
Автор: साहित्यिक गप्पा आणि कविता - Shrikant Gopal Kale
Загружено: 2023-12-04
Просмотров: 1382
नेवासे येथील तत्कालीन करवीरेश्वर मंदिरातील खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तो खांब म्हणजेच पैसाचा खांब. आता तिथे पैसाच्या खांबाचेच देऊळ झाले आहे. त्याला ज्ञानेश्वरांचे मंदिर असेही म्हणतात. काय आहे पैस याचा अर्थ? ज्ञानदेवांच्या प्रज्ञेने काय पाहिले तिथे ? काय वाटते त्या पैसाच्या खांबाला स्पर्श करून? पैसाच्या खांबाविषयीचा हा छोटासा पण काव्यात्मक व्हिडिओ जरूर पहा.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे डॉ. सांकलिया व डॉ. इरावती कर्वे यांनी केलेले उत्खनन, त्यांना सापडलेले शिलालेख हे नेवासे या गावाचा पुरातन इतिहास शोधायला सहाय्य्यभूत ठरले आहे. त्या माहितीच्या आधारे तसेच "सार्थ ज्ञानेश्वरी" या प्रा. शं. वा. उर्फ मामासाहेब दांडेकर यांच्या ग्रंथातील संदर्भ घेऊन हा अभ्यासपूर्ण पण तरीही काव्यात्मक वाटेल असा छोटासा व्हिडिओ केलेला आहे.
" केवळ करमणूक नाही तर विचारांनाही खाद्य " या उद्देशाने "साहित्यिक गप्पा आणि कविता" या यू ट्यूब चॅनेलवर असे विविध विषयांवरील व्हिडिओ तसेच कविताही सादर केल्या जातात. चॅनलला विनामूल्य SUBSCRIBE करून या उपक्रमाला बळ द्या. व्हिडिओचा पूर्ण आनंद घेण्यासाठी शक्य असल्यास तो टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर पहा. आपल्या प्रतिक्रिया यू ट्यूब वर व्हिडिओ खालील कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्यास त्या कायमस्वरूपी राहतात, म्हणून त्या तिथे नोंदवाव्यात ही प्रेमाची विनंती. 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: