वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म | Vaidnyanik Drushtikon aani Adhyaatm | Shrikant Gopal Kale
Автор: साहित्यिक गप्पा आणि कविता - Shrikant Gopal Kale
Загружено: 2022-02-26
Просмотров: 2987
रसिकहो, नमस्कार.
२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन. या निमित्ताने मराठी भाषेसंबंधी खूप पोस्ट्स, ब्लॉग आणि व्हिडिओ तुमच्या मोबाईल फोनवर येत असतात. त्यामध्ये "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" आणि "माझ्या मराठीची गोडी" या दोन वस्तुतः नितांत सुंदर, पण फॉरवर्ड करून करून गुळगुळीत झालेल्या दोन कविताही असतातच. अनेक समारंभातून मराठी भाषेसंबंधी नेहेमीच्या प्रथेप्रमाणे बोलले जाते. मात्र राजमुकुट घालून मंत्रालयाच्या दाराशी अंगावरील लक्तरे सावरीत उभी असलेल्या अगतिक मराठीविषयी जागतिक मराठी संमेलनात कुसुमाग्रजांनी जे जळजळीत वास्तव १९८९ साली मांडले होते त्यात ३३ वर्षांनंतरही फारसा बदल झाला आहे असे रोजचे जीवन जगताना मला तरी जाणवत नाही. जो पर्यन्त मराठी भाषा ही उच्च ज्ञानविज्ञानाची आणि आपल्या उपजीविकेची भाषा होत नाही तो पर्यंत यात बदल होणे शक्य नाही असे माझे मत आहे. पण हे घडताना दिसत नाही.२७ फेब्रुवारीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीला आपला देश "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा करतो. राष्ट्रीय जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा हा त्यामागील उद्देश आहे. पण ज्या उत्साहाने २७ फेब्रुवारीला मराठी भाषेसंबंधी तुमच्या मोबाईलवर पोस्ट येतात त्याच्या तुलनेत २८ फेब्रुवारीला मराठी माणसांच्या जीवनात फारसे काही वैचारिक आदान -प्रदान घडताना दिसत नाही; म्हणूनच हा व्हिडिओ मी मराठी साहित्यविषयक न करता "वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म" या थोड्याशा गंभीर पण एका मूलभूत विषयावर केला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असणे म्हणजे नेमके काय, तसेच अध्यत्मिक दृष्टिकोन कशाला म्हणावे, हे दोन दृष्टिकोन परस्पर विरोधी आहेत काय आणि सफल जीवनासाठी यापैकी कोणती जीवनदृष्टी अंगिकारणे फायदेशीर ठरते या महत्वपूर्ण मुद्यांची अगदी सोप्या शब्दात इथे मांडणी केली आहे. "केवळ करमणूक नाही तर विचारांनाही खाद्य" ह्या उद्देशाने "साहित्यिक गप्पा आणि कविता" या चॅनलच्या माध्यमातून महिन्याला एक व्हिडिओ सादर केला जातो. त्यातील हा 11वा व्हिडिओ. जर आपल्याला या साहित्यक गप्पा आणि कविता आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांना हा व्हिडिओ पाठवून त्यांनाही या साहित्ययात्रेत सामील करून घ्या. धन्यवाद.
श्रीकांत गोपाळ काळे
साहित्यिक गप्पा आणि कविता
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्द वाटू जन धन लोकां ।
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: