भाग 2 : एकजुटीसाठी स्त्रीवादी चळवळीत संवाद हवा - गटचर्चा | महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद | MSMP
Автор: Maharashtra Strimukti Parishad
Загружено: 2026-01-14
Просмотров: 197
भाग 2 : एकजुटीसाठी स्त्रीवादी चळवळीत संवाद हवा - गटचर्चा | महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद | MSMP
महाराष्ट्र स्त्रीवादी परिषदेत स्त्रियांच्या चळवळीत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून कानकोपर्यातील जवळपास 700 स्त्रिया सामील झाल्या आहेत. 21 डिसेंबरला या स्त्रियांचे कोणते प्रश्न आहेत हे ऐकून घेण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांविषयी गट चर्चेच्या माध्यमातून स्त्रियांना बोलते करण्यासाठी संग्राम संघटनेच्या मीना सेशू तसेच मुंबईतील फोरमच्या चायनिका शहा संवाद साधला.
सादर गट चर्चेत अनेक वंचित घटकातील स्त्रिया, भटक्या विमुक्त समाजातील स्त्रिया जोडल्या गेल्या आहेत. बचत गट, विविध यूनियन, जात धर्मीय समुहांच्या पुढाकार घेणार्या स्त्रिया स्त्रीमुक्ती चळवळीचे जनजागृती कार्यक्रम अशा अनेक माध्यमातून स्त्रिया जोडल्या गेल्या.
महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या अनेक प्रतिनिधींनी गेले वर्षभर सेफ्टी ऑडिट, मनुस्मृती नको संविधान हवे, युवा अभियान तसेच विभागवार मिटिंगा, बैठका, गट चर्चा अशा माध्यमातून तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या प्रक्रियेत फक्त मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रियांचेच प्राबल्य राहिले. अनेकांना असे वाटत आहे की, परिषदेमध्ये आपल्या गटाचे, समूहाचे आणि समस्यांचे प्रतिनिधित्व दिसत नाही. ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही जाहीर गट चर्चा घेतली गेली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: