मकरसंक्रांतीची खास तिळाची पोळी | १० दिवस टिकणारी | Tilachi Poli Recipe | Mandakini Recipe
Автор: Premachi Rasoi – SasuSun Jodi
Загружено: 2026-01-10
Просмотров: 110
हिवाळ्यात खास करून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बनवली जाणारी पारंपरिक तिळाची पोळी ही आरोग्यदायी आणि चविष्ट अशी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. भाजलेले तीळ, गूळ आणि सुगंधी वेलची यांच्या मिश्रणामुळे या पोळीला खास चव येते. मऊसूत, पौष्टिक आणि उष्ण गुणधर्म असलेली ही पोळी थंडीत शरीराला उब देण्यासाठी उत्तम असते.
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारी ही तिळगुळाची पोळी नक्की करून पाहा. सणासुदीला, खास पाहुण्यांसाठी किंवा रोजच्या जेवणातही ही पोळी सगळ्यांनाच आवडते.
तिळाच्या पोळीचे साहित्य:
पोळीच्या पिठासाठी :
गव्हाचे पीठ – 1 1/2 वाटी
बेसन – 2 चमचा
मैदा – 2 चमचा
पाणी – मळण्यासाठी (आवश्यकतेनुसार)
मीठ - चवीनुसार
तेल – 2 चमचा
सारणासाठी :
पांढरे तीळ – 1 वाटी
शेंगदाणे – 1/2 वाटी
खोबरं – 1/2 वाटी
तांदूळ पीठ - 1/2 वाटी
बेसन – 2 चमचा
तेल – 2 चमचा
वेलची पावडर – 1 चमचा
गूळ (किसलेला) – 1 1/2 वाटी
तूप – 2 टेबलस्पून
वेलची पावडर – 1/2 टीस्पून
मीठ - चिमूटभर
👉 रेसिपी आवडल्यास लाईक 👍 करा
👉 शेअर 🔄 आणि तुमचा अभिप्राय 💬 कमेंटमध्ये नक्की द्या
👉 अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला Subscribe करा ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: