🌼 सणासाठी खास पुरणपोळी स्वयंपाक | १०–१२ लोकांसाठी | Complete Maharashtrian Menu | Mandakini Recipe
Автор: Premachi Rasoi – SasuSun Jodi
Загружено: 2026-01-02
Просмотров: 209
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत १०–१२ लोकांसाठी संपूर्ण पारंपरिक पुरणपोळी स्वयंपाक 😋
घरगुती पद्धतीने, अचूक मोजमापात तयार केलेली मऊ पुरणपोळी, सोबत खमंग कटाची आमटी, भाजी आणि इतर पदार्थांचा हा स्वयंपाक सण-समारंभ, पूजा, पाहुण्यांसाठी अगदी परफेक्ट आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला
✔️ किती डाळ, किती गूळ घ्यायचा
✔️ पुरण योग्य घट्ट कसं करायचं
✔️ पोळ्या मऊ राहण्यासाठी टिप्स
✔️ मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना लागणारे अचूक प्रमाण
सगळं सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने दाखवले आहे. पहिल्यांदा करणाऱ्यांनाही हा पुरणपोळी स्वयंपाक नक्की जमेल 👍
👉 पुरण पोळी साहित्य:
👉 पुरणासाठी:
हरभरा डाळ – 1 किलो
हळद – 1/2 चमचा
गूळ – 750 ग्रॅम (किसलेला / बारीक)
वेलची (पूड) - 1 चमचा
पाणी (गरजेनुसार)
👉 पोळीच्या कणकेसाठी:
गव्हाचे पीठ – २ कप
हळद – चिमूटभर
मीठ – चिमूटभर
तेल – 1 चमचा
👉कटाची आमटी साहित्य:
जिरे - 1/2 चमचा
मोहरी - 1/2 चमचा
कढीपत्ता
लवंग,तेजपान,मिरे
बाजरी - 2 चमचा
तांदूळ - 2 चमचा
हरभरा डाळ - 2 चमचा
खसखस - 1 चमचा
हिरवी मिरची – 6 ते 7
लाल तिखट – 1 ½ टीस्पून
गरम मसाला - 4 चमचा
लसूण - 1/2 वाटी
ओलं खोबरं - 1 वाटी
सुकं खोबरं - 1 वाटी
हिंग - 1/2 चमचा
हळद - 1 चमचा
मीठ – चवीनुसार
तेल
कांदा – 4 मध्यम (बारीक चिरलेला)
कोथिंबीर – बारीक चिरलेली
कात (डाळ शिजवल्यानंतर उरलेलं पाणी)
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी चॅनलला जोडलेले राहा 🌼
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: