कड्यावरचा गणपती, आंजले, केतकी वाडी, लाईट हाऊस,कोकण किनारपट्टी दिवस चौथा
Автор: GD PUNEKAR
Загружено: 2025-11-08
Просмотров: 153
कड्यावरचा गणपती, आंजले, केतकी वाडी, लाईट हाऊस,कोकण किनारपट्टी दिवस चौथा
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहासप्रसिद्ध सुवर्ण दुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोली पासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गाव आहे . याच आंजर्ले गावात सुप्रसिद्ध ” कड्यावरचा गणपती” स्थान आहे. कड्यावरचा गणपती हे आज कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. एके काळी पुलाअभावी द्राविडी प्राणायाम करावा लागणारा प्रवास आज नैसर्गिक विविधतेने नटलेल्या रस्त्याने सुखकारक झाला आहे. कड्यावरील गणपती मंदिराच्या उगम कथेबाबत अनेक वदंता असल्या तरी त्याचा निर्मिती काळ खात्रीलायकरीत्या सांगणारी कागदपत्रे आज उपलब्द्ध नाहीत. अनेक आख्यायिकांची साक्ष खरी मानल्यास हे मंदिर १२ व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम लाकडी असण्याची शक्यता आहे. इ. स. १६३० पासून या देवस्थानाचे व्यवस्थापन “नित्सुरे” घराण्याकडे आले असावे. त्यापूर्वी प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. समुद्रकिनाऱ्यावर “अजयरायलेश्वर” म्हणजे शंकर व सिद्धिविनायक अशी दोन मंदिरे होती.
,
GD PUNEKAR
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: