इंडिगोवर DGCAची मोठी कारवाई | २२.२० कोटींचा दंड, ५० कोटींची बँक हमी | DD Sahyadri
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-01-17
Просмотров: 68
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंडिगो विमानसेवेत झालेल्या मोठ्या गोंधळाप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कठोर कारवाई केली आहे. DGCAनं इंडिगोवर २२ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, परिचालन व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी ५० कोटी रुपयांची बँक हमी देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसंच, इंडिगोचे कार्यकारी प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना गंभीर इशाराही देण्यात आला आहे. तपास अहवालात विमानसेवेची कार्यपद्धती, कर्मचारी बदल व्यवस्था, सॉफ्टवेअर प्रणाली आणि व्यवस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
या त्रुटींमुळे ३ ते ५ डिसेंबरदरम्यान अडीच हजारांहून अधिक उड्डाणं रद्द झाली, तर सुमारे दोन हजार विमानसेवांना मोठा विलंब झाला, ज्याचा फटका लाखो प्रवाशांना बसला.
#IndiGo #DGCA #AviationNews #FlightCancellation #IndianAirlines #DDSahyadri
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: