परळीमधील बंदुकशाहीचा बंदोबस्त झालायं ८२ दिवस का होईना पण गुन्हा नोंद केलाय | Kailash fad |Nikhil fad
Автор: News Tapu
Загружено: 2025-02-12
Просмотров: 140505
#paralicrime #kailashfad #beed #valmikkarad #navneetkawat #nikhilfad #anjalidamania #devendrafadnavis #spnavneetkawat #beedcrime #dhananjaymunde #maharashtrapolitics #santoshdeshmukh #pankajamundhe #bajrangsonwane #sandipkshirsagar #jitendraawhad #sureshdhas
परळी विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजसाहेब देशमुख हे धनंजय मुंडे यांच्या विरोधातले महा विकास आघाडीचे उमेदवार होते. याच राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानच्या दिवशी अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोप केले. तसंच बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आल असा देखील राजसाहेब देशमुख यांनी आरोप केला होता. तेव्हा या प्रकरणाभोवती चांगलंच राजकारण तापलं होतं आणि कायदा सुव्यवस्था देखील चव्हाट्यावर आली होती. याच निवडणुकीदरम्यान राजसाहेब देशमुख हे परळी शहरातल्या बँक कॉलनी परिसरातल्या एका मतदान केंद्रावर गेले असता. त्यावेळी त्यांच्यासोबत एक अंगरक्षक म्हणून पोलीस शिपाई होता. याच पोलीस शिपायाला राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत मतदान केंद्राकडे जाण्यापासून अडवण्यात आले होते, आणि हे अडवणारे दुसरे तिसरे कोण नव्हते, तर ते होते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास पड आणि त्याचा पुत्र निखिल फड तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा इतक्या दिवसानंतर या गोष्टी का सांगतोय. त्याचं झालं असं की याच कैलास फड आणि निखिल फडवर पोलीस शिपायाला मतदान केंद्रामध्ये जाण्यापासून अडवणे आणि धमकावणे, तसेच हवेत गोळीबार केल्याच्या जुन्या प्रकरणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर बापाची अर्थात कैलास फडची बंदूक घेऊन आपल्या कमरेला लावत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणारा त्याचा मुलगा निखिल फड या दोघांवर सुमारे 82 दिवसानंतर परळीत गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.
शिवाय दमानिया यांनी बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांनाही याबद्दल पत्र व्यवहार करत, या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: https://newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: