काना नगराच्या लग्नामधून, महिमा गाजविला | मराठी भक्तिगीत २०२६
Автор: मराठी गॉस्पेल रिल्स
Загружено: 2026-01-11
Просмотров: 1973
काना नगराच्या लग्नामधून, महिमा गाजविला | मराठी भक्तिगीत २०२६
दारू नव्हे रे द्राक्षरस हे मराठी ख्रिस्ती भजन, जे व्यसनापासून दूर राहण्याचा आणि पवित्र जीवन जगण्याचा संदेश देते.
काना नगरातील लग्नात प्रभु येशूने केलेल्या अद्भुत कार्यावर आधारित हे गीत आपणास आत्मिक बळ देणारे आहे.
प्रियानो, काना येथे येशूने केलेला पहिला अद्भुत चमत्कार हा पाण्याचे वाइन (ताजा द्राक्षरस) मध्ये रूपांतर करण्याचा होता. परंतु तो द्राक्षरस झिंग आणणारी ( वाइन ) दारू नव्हती, तर शुद्ध, ताजा आणि जीवन देणारा पवित्र रस होता — जो थकलेल्या आत्म्यांना विश्रांती देणारा होता.
प्रभु येशू ख्रिस्त कधीही पापाला प्रोत्साहन देत नाही; तो नेहमी पवित्रतेकडे, संयमाकडे आणि आत्मिक जीवनाकडे नेतो.
आज मात्र अनेक लोक त्या चमत्काराच्या नावाखाली ( वाइन ) दारू पिण्याचे समर्थन करतात आणि झिंगण्यास सुरुवात करतात हे देवाच्या पवित्र वचनाच्या विरुद्ध पाप आहे. कारण देवाचे वचन आपल्याला शिकवते की आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे, झिंगवणाऱ्या ( वाइन ) दारूने नव्हे.
(salutation)
पवित्र देवा, दयाळू बाप्पा, तुजला करितो नमन।
तुझ्या वचनाने उजळू दे, आमचे हे जन-मन।
शरीर हे देवाचे मंदिर, राखूया त्याचे पावित्र्य।
येशूच्या नावाने गाऊया, जीवनाचे हे नित्य सत्य।
(Chorus)
दारू नव्हे रे, द्राक्षरस तो, येशूने बनविला।
काना नगराच्या लग्नामधून, महिमा गाजविला ॥
Verse 1
पाण्याचे केले द्राक्षरस, नवल घडले थोर।
थकल्या जीवांना लाभला, तो आनंद अपार।
झिंगावया तो नव्हता प्याला, होता आशीर्वाद।
पवित्र पेयाने मिळाला, ईश्वरी साद ॥ 1 ॥
(Chorus)
दारू नव्हे रे, द्राक्षरस तो, येशूने बनविला।
काना नगराच्या लग्नामधून, महिमा गाजविला ॥
Verse 2
दारू म्हणजे विष हे जाणा, संसाराची होळी।
बुद्धी भ्रष्ट होते मानवा, काळोखाची पाळी।
घर-दार लागेल भिकेला, नका होऊ हो वेडे।
बायबल सांगते सावध व्हा, नका टाकू पाऊल पुढे ॥ 2 ॥
(Chorus)
दारू नव्हे रे, द्राक्षरस तो, येशूने बनविला।
काना नगराच्या लग्नामधून, महिमा गाजविला ॥
Verse 3
शरीर हे मंदिर देवाचे, आत्मा त्यात वसे।
विटाळू नका त्या मंदिराला, व्यसनाच्या फासे।
पिणारा आणि पाजणारा, शापित असे वचन।
शुद्ध अंतःकरणे करा, प्रभूचे हो भजन ॥ 3 ॥
(Chorus)
दारू नव्हे रे, द्राक्षरस तो, येशूने बनविला।
काना नगराच्या लग्नामधून, महिमा गाजविला ॥
Verse 4
पवित्र आचरण धरा मनी, येशू देईल शांती।
व्यसनाच्या या अंधारातून, मिळेल मुक्तीची क्रांती।
'ख्रिस्त-प्रेमाचा' रस चाखा, जो देईल नवजीवन।
त्याच्या चरणी अर्पण करा, तुमचे तन अन मन ॥ 4 ॥
(Chorus)
दारू नव्हे रे, द्राक्षरस तो, येशूने बनविला।
काना नगराच्या लग्नामधून, महिमा गाजविला ॥
✍️ Song Written By: Brother Vipul Manik Shinde
#marathibible #bibleversemarathi #christianmarathi #biblestudymarathi #marathichristian #marathibibleverse #मराठीबायबल #marathichristiansong marathi christian song
yeshu bhajan marathi
marathi gospel
christian marathi song
jesus song marathi
daru navhe re draksharas
bible based song marathi
marathi worship
christian motivation song
marathi devotional song
church song marathi
marathi gospel message
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: