Mental toughness improves health | मेंटल टफनेस आणि आरोग्य
Автор: The Healthy Show
Загружено: 2025-08-19
Просмотров: 1480
मेंटल टफनेस म्हणजे फक्त कठोर निर्णय घेणे किंवा भावनांना दाबून ठेवणे नाही. डॉ. संदीप पाटील या चर्चेत सांगतात की खऱ्या मानसिक ताकदीमध्ये सेन्सिटिव्हिटी आणि लॉजिकचा योग्य संगम असतो. खूप इमोशनल झाल्यास निर्णय चुकू शकतात, पण सेन्सिटिव्हिटी म्हणजे परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची ताकद. संकटं आली तर प्रत्येक जण डळमळतो, पण खंबीर लोक लगेच उठून "What’s Next?" असा विचार करतात.
बालपणातील कठोर अनुभव, आयुष्यातील संघर्ष आणि परिस्थितींना सामोरं जाण्याची वृत्ती ही मानसिक ताकद वाढवते. पळून न जाता समस्या तोंड द्यायला शिकणं हेच आत्मविश्वास आणि टफनेस तयार करतं. महात्मा गांधींसारख्या नेत्यांनी परिस्थिती बदलली कारण त्यांनी त्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची निवड केली.
मनाची ताकद ही जन्मजात नसते, ती शिकता येते, घडवता येते. मेंटल टफनेस ही एक स्किल आहे जी आपण सर्वजण आत्मसात करू शकतो. हा संवाद ऐकून तुम्हाला समजेल की संकटं टाळता येत नाहीत, पण त्यांना सामोरं कसं जायचं हे तुमच्या हातात असतं.
#mentaltoughness #sensitivity #emotionalstrength #healthyshow #marathimotivation #drsandeepatil #positivemindset #stressmanagement #lifechallenges #marathispeech #mindpower #selfgrowth #mentalhealth #inspiration #overcomechallenges
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: