“गणपतीपुळे आणि कुणकेश्वर | कोकणातील दोन पवित्र देवस्थानांचा प्रवास”|| DAY 1 AT MALVAN TRIP🌴🥥♥️
Автор: kiran nikam vlogs
Загружено: 2026-01-03
Просмотров: 642
कोकणातील दोन अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य देवस्थानांचा हा खास प्रवास 🙏🌊
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत
🔱 गणपतीपुळे देवस्थान – जिथे संपूर्ण गावाचा एकच गणपती मानला जातो
🔱 कुणकेश्वर मंदिर – दक्षिण कोकणाची काशी, छत्रपती शिवरायांनी जिर्णोद्धार केलेलं शिवमंदिर
समुद्रकिनाऱ्यालगत वसलेली ही देवस्थाने, त्यांचा इतिहास, परंपरा, यात्रा, पायी वाऱ्या आणि कोकणचा निसर्गसौंदर्य यांचा सुंदर संगम या व्हिडिओत अनुभवायला मिळेल.
जर तुम्ही कोकण ट्रिप प्लॅन करत असाल किंवा भक्ती आणि पर्यटन एकत्र अनुभवायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा ✨
गणपतीपुळे देवस्थान :
गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हणले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.
त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे.
रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटांनी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत. गणपतीपुळे येथे मेणाच्या पुतळ्याचे एक संग्रहालय नव्यानेच चालू झाले आहे.
--------------------------------
कुणकेश्वर मंदिर :
कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं, कुणकेश्वराच्या मंदिराजवळचा हा परिसर आहे. स्वच्छ, कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो. खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडीचे मोदक चविष्ट आहेत .देवगडला उत्तम माशाचे जेवण मिळते. माफक दरात कोकण या ठिकाणी अनुभवता येतो.
कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हणले जाते.
दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षॉंनी कुणकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.
🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share 🔁 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की कळवा 😊
#ganpatipule #Kunkeshwar #KonkanDarshan #MarathiVlog
#KonkanTrip #SpiritualJourney #TempleVlog
#MaharashtraTourism #Bhakti #IndianTemples
#TravelVlog #SeaSideTemple#kokan #ganpatipule #malavan #kokan_diary @kokansanskruti @KokanVastu #traveling #vlogging #vlogginglife #travel #traveling #travelvlog #tranding #vlogging #vlog #vlogshorts #viral #history #templevlog #temple #hindu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: